शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

... आणि मध्यरात्री जाऊन त्यांनी वाचवला आजीबाईचा जीव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:00 IST

पत्र्याच्या एका लहानशा खोपटात एकट्या राहणाऱ्या आजीबाई. कसा कोण जाणे पण त्यांच्या त्या लहानशा झोपडीत तब्बल साडेचार फुटाचा जाडजूड मण्यार साप घुसला व पलंगाखाली दडून बसला.

ठळक मुद्देसाडेचार फुटाचा मण्यार साप दडला घरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरातील शांतीनगर हा भाग. कावळापेठ रेल्वे क्रॉसिंगलगतची वस्ती.. बुधवारी मध्यरात्रीची वेळ. पत्र्याच्या एका लहानशा खोपटात एकट्या राहणाऱ्या आजीबाई. कसा कोण जाणे पण त्यांच्या त्या लहानशा झोपडीत तब्बल साडेचार फुटाचा जाडजूड मण्यार साप घुसला व पलंगाखाली दडून बसला. आजीबाईंचे नशीब मोठे की तो बाहेर खेळणाऱ्या मुलांनी पाहिला व त्यांनी आरडाओरडा करत सगळ्याना सूचित केले..पाहता पाहता नागरिकांची गर्दी जमली. पण कोणाचीही हिंमत होईना त्या सापाला पकडण्याची. अखेरीस पोलिसांना फोन केला गेला. पोलिसांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना कळवले. तेव्हा मध्यरात्र होत आली होती.. वस्तीतील सर्वजण जागेच होते. शुभम पराळे यांनी फक्त त्याकडे नीट लक्ष ठेवा, त्याला काहीच करू नका अशा सूचना दिल्या व ते तातडीने निघाले.आजीबाईंना कमीतकमी हालचाल करीत पलंगावरून खाली येऊन बाहेर येण्याची सूचना केली व त्यांनी तशी ती पाळलीही. काही वेळातच सर्पमित्र हजर झाले. त्यांनी त्या विषारी जातीच्या सापाला पकडून बरणीत बंद केले व वनविभागाच्या सुपूर्द केले.. आणि आजीबाईंसह सगळ्यानी सुटकेचा निश्वास टाकला.. हे सगळे घडले तेव्हा मध्यरात्र उटलून गेली होती.. सर्वांनी सर्पमित्राचे आभार मानले व बक्षीसही दिले...

टॅग्स :snakeसाप