शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘लिकेज’मुळे होणारी पाणी नासाडी थांबविणार ‘अमृतम्’

By admin | Updated: June 12, 2017 02:23 IST

उन्हाळा आला की शहरातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. ‘पाणी बचावो’ मोहिमांना वेग मिळतो.

विद्यार्थी-महाविद्यालयाचा पुढाकार : विशेष ‘अ‍ॅप’ची निर्मितीयोगेश पांडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळा आला की शहरातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. ‘पाणी बचावो’ मोहिमांना वेग मिळतो. मात्र प्रत्यक्षात अनेक घरांमधील नळांमध्ये ‘लिकेज’ असल्यामुळे वर्षभरात लाखो लिटर पाणी वाया जाते. ही बाब अनेकदा लोक गंभीरतेने घेत नाहीत. यासंदर्भातच जनजागृतीसाठी काही विद्यार्थी सरसावले आहेत. नळांमधून होणारी ही पाण्याची अनावश्यक गळती थांबविण्यासाठी ते अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून उपाययोजनादेखील सुचविणार आहेत. नागरिकांच्या घरातून दररोज किती पाणी वाया जाते याचा अभ्यास करण्यासाठी ‘अमृतम्’ या विशेष मोबाईल ‘अ‍ॅप’चीदेखील निर्मिती करण्यात आली आहे.‘नागपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयाच्या ‘इनोव्हेटिव्ह सेल’तर्फे हा उपक्रम राबविण्याची संकल्पना समोर आली. शहरातील अनेक घरांमध्ये ही समस्या आहे. कुठे नळ तर कुठे ‘फ्लश’मध्ये ‘लिकेज’ असते. यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. अनेकदा तर लोकांना ‘लिकेज’ची माहितीदेखील नसते. यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच कायमस्वरूपी तांत्रिक उपाय काढता यावा या उद्देशाने महाविद्यालयाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.सुरुवातीला हे विद्यार्थी दर शनिवार-रविवार शहरातील प्रभागांमधील घरांना भेटी देतील. यावेळी नागरिकांच्या घरातील जलप्रणालीची ते पाहणी करतील व कुठे ‘लिकेज’ आहे का ते तपासतील. त्यानंतर संबंधित घरातून नेमके किती पाणी दर दिवसाला ‘लिकेज’मुळे वाया जाते ते तपासण्यासाठी संबंधितांच्या मोबाईलवर ‘अ‍ॅप’ टाकून देतील. या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून नेमके किती पाणी वाया जात आहे याचा ‘डाटा’ एकत्र करण्यात येईल. त्यानंतर सविस्तर अभ्यास करून विस्तृत अहवाल नागपूर महानगरपालिकेला सादर करण्यात येईल. शिवाय समस्येवर कायमस्वरूपी उपायदेखील सुचविण्यात येईल.‘बूंद बूंद बचाओ’ हीच भुमिकासंबंधित योजना माझ्या मनात अनेक वर्षांपासून होती. अखेर या वर्षी ती प्रत्यक्षात उतरते आहे. संगणक विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयातील २०० विद्यार्थी यात स्वयंसेवक म्हणून काम करतील. सहा महिन्यांत साधारणत: दोन लाख घरापर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे. या उपक्रमात आम्हाला ‘नीरी’चीदेखील मौलिक साथ लाभत असून पाणी वाचविण्यासंदर्भातील तांत्रिक बाबींमध्ये ते सहकार्य करणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कडू यांनी दिली.