शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमेयचे प्रशंसनीय प्रयत्न

By admin | Updated: December 19, 2014 00:46 IST

भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचा सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराने विद्ध्वंस केला. लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील आपत्तीग्रस्तांना मदत व्हावी,

छायाचित्रांतून मांडले काश्मीरचे वास्तव : लंडनमधून मिळविली ६० हजाराची मदतनागपूर : भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचा सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराने विद्ध्वंस केला. लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील आपत्तीग्रस्तांना मदत व्हावी, म्हणून अमेय कुळकर्णी नावाच्या ९ वर्षीय बालकाने काश्मीरची चित्रे काढून, तेथील वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहचविली. त्याच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने कॅ मेराबद्ध केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत लावण्यात आले आहे. इम्प्रेशन आॅफ इंडिया नावाने लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला छायाचित्रकार शेखर सोनी, शेफ विष्णू मनोहर, अमयचे आजी आजोबा मोहन व दुहिता कुळकर्णी, वडील अधिष कुलकर्णी उपस्थित होते. या प्रदर्शनात लावलेल्या छायाचित्रांची तो विक्री करून काश्मिरातील पूरग्रस्तांना मदत करणार आहे. मूळचा नागपूरचा असलेला अमेय सध्या आपल्या पालकासोबत लंडनला राहतो. गेल्या उन्हाळ्यात तो जम्मू-काश्मीरच्या सफरीवर गेला होता. त्याने तिथले भरपूर फोटो काढले. त्या छायाचित्रांचे प्रेझेंटेशन बनवून लंडनमधील आपल्या वर्गमित्रांना दाखविले. त्यांच्याकडून त्याने ६०,००० रुपयांची मदत मिळविली होती. अमेयच्या कृतीचे कौतुक व्हावे व मदतनिधीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने अमेयच्या आजी-आजोबांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन शुक्रवारी १९ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८.३० खुले राहणार आहे. प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतून जमा होणारा सर्व निधी प्रधानमंत्री आपत्ती निवारण कोषात दान केला जाईल.(प्रतिनिधी)