शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

आंबेकर अजूनही फरार

By admin | Updated: February 25, 2016 02:55 IST

मकोकाचा गुन्हा दाखल होऊन २५ दिवस उलटले तरी गँगस्टर संतोष आंबेकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

समन्वयाचा अभाव : ईडी-आयटीला दिली माहिती नागपूर : मकोकाचा गुन्हा दाखल होऊन २५ दिवस उलटले तरी गँगस्टर संतोष आंबेकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. कारवाईची शक्यता लक्षात घेताच आंबेकर फरार झाल्याबाबत झोन एकचे डीसीपी शैलेश बलकवडे यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणात समन्वयाचा अभाव राहिल्याचे कबूल केले. बलकवडे म्हणाले, पोलीस ठाण्यातून रवाना झाल्यानंतर तो लगेच फरार झाला. या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा दबाव असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले. आंबेकरला त्याची जागा लवकरच दाखविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आंबेकर आणि युवराज माथनकर यांच्या घर आणि कार्यालयाची झडती घेतली असता त्यात संपत्तीचे दस्तऐवज, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह सापडले. यात दोघांनीही गुन्हेगारी पद्धतीने संपत्ती जमा केल्याचा संशय येतो. या कारणामुळे आयकर विभाग आणि प्रवर्तन निदेशालय (ईडी) यांना सुद्धा प्रकरणाची माहिती आणि दस्तऐवज देण्यात आले. मकोकाच्या जुन्या प्रकरणात आंबेकर सुटल्याबाबत विचारले असता बलकवडे यांनी या प्रकरणाचे ठोस पुरावे गोळा करण्यात आल्याने आरोपी सुटण्याची शक्यता नाही. प्रत्येक कारवाईचे व्हीडिओ शुटींग केले जात आहे. संजय फातोडेची पोलीस कोठडी दोन दिवसासाठी वाढविण्यात आली. (प्रतिनिधी)- ते दिल्ली पोलीसच वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये चौकशीसाठी आलेले संदिग्ध व्यक्ती दिल्ली पोलीसच होते, असे बलकवडे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, यासंबंधी वर्तमानपत्रात वृत्त प्रकाशित झाल्यावर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत: पोलिसांशी संपर्क साधून आपल्या ओळखपत्राची एकेक प्रत पाठविली आहे. ते एका फसवणुकीच्या प्रकरणात आरोपीच्या शोधात येथे आले होते. या संबंधात दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडूनही रिपोर्ट मागवण्यात आले आहे. बलकवडे यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये आल्याबाबत पोलिसांना माहिती दिली नसल्याने त्याबाबत संशय निर्माण झाला.