शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 20:43 IST

ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अ‍ॅण्ड लिटरेचरतर्फे यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

ठळक मुद्देआंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अ‍ॅण्ड लिटरेचरचे पुरस्कार घोषितजंजाळ, वाघमारे, मांद्रेकर, भोसले, खुणे आणि घोष यांनाही पुरस्कार जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अ‍ॅण्ड लिटरेचरतर्फे यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अ‍ॅण्ड लिटरेचरचे अध्यक्ष दादाकांत धनविजय यांनी शनिवारी पत्रपरिषदेत यंदाच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. करंजा येथील प्रकाश जंजाळ यांच्या ‘आंबेडकरी क्रांतिनायक : बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे या पुस्तकासाठी वसंत मून वैचारिक - संशोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबतच सोलापूरचे योगिराज वाघमारे यांच्या ‘गहिवर’ या कादंबरीला बाबुराव बागुल कादंबरी पुरस्कार, गोवा येथील दादू मांद्रेकर यांच्या ‘ओंजळ लाव्हाची’ या कवितासंग्रहासाठी नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार, पुण्याचे नामदेव भोसले यांच्या ‘ये हाल’ या नाट्यकृतीसाठी अश्वघोष नाट्य पुरस्कार, उस्मानाबादचे जयराज खुणे यांच्या ‘स्वर-संगर’ या आत्मकथनाला दया पवार आत्मकथन पुरस्कार तर जबलपूरचे असंघ घोषण यांच्या ‘समय को इतिहास लिखने दो’ या पुस्तकासाठी भगवान दास हिंदी साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता हिंदी मोरभवन येथील मधुरम सभागृहात हे पुरस्कार वितरित करण्यात येतील. पत्रपरिषदेला डॉ. मच्छिंद्र चोरमारे, राजन वाघमारे, महेंद्र गायकवाड, डॉ. सविता कांबळे उपस्थित होते.

 

टॅग्स :literatureसाहित्यDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर