शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या

By admin | Updated: October 24, 2015 03:19 IST

देशात दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दलितांचे संरक्षण करण्यात पोलीस तसेच देशातील गुप्तचर संस्थांही अपयशी ठरल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार : रामदास आठवले यांची मागणीनागपूर : देशात दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दलितांचे संरक्षण करण्यात पोलीस तसेच देशातील गुप्तचर संस्थांही अपयशी ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे केली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांसाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. हरियाणा येथील फरिदाबाद येथे एका दलित कुटुंबाला जाळून मारण्यात आल्याच्या घटनेचा उल्लेख करीत खा. आठवले यांनी सांगितले की, १९ तारखेला ही घटना घडली. आपण स्वत: २० तारखेला पीडितांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. हरियाणा सरकारने ती मागणी पूर्ण केली. तसेच दहा लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा केली. रिपाइंतर्फे सुद्धा पीडितांना लवकरच एक लाख रुपयाची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार कुणाचे आहे, त्यामुळे दलितांवर अत्याचार होत आहेत, असे म्हणता येणार नाही. कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आहे. जातीवादी मानसिकतेचे लोक अजूनही आहेत. विशेषत: गावांमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. या प्रकारांना आळा बसावा म्हणून अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट अमलात आला होता. परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचेही खा. आठवले यांनी स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली. व्ही.के. सिंह यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करीत बेताल वक्तव्य असल्याचे ते म्हणाले. राज्यातील युती सरकारबद्दल त्यांना विचारले असता सरकारला कुठलाही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सत्तेत सहभागी करून घेण्यासंदर्भात भाजपने शब्द दिला होता, तो त्यांनी पाळावा, याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली. पत्रपरिषदेत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहन पटेल, भीमराव बनेड, राजन वाघमारे, बाळू घरडे, राजू बहादुरे डॉ. मनोज मेश्राम, पवन गजभिये आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)