शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे ‘व्हीजन’ सर्वांगीण विकासाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समानतेसोबतच देशाच्या एकूणच विकासाचे व्हीजन मांडले आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्राबाबत एक व्हीजन मांडले आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरी : डॉ. आंबेडकर : ‘द आर्किटेक्ट आॅफ मॉडर्न इंडिया’ गौरव ग्रंथाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समानतेसोबतच देशाच्या एकूणच विकासाचे व्हीजन मांडले आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्राबाबत एक व्हीजन मांडले आहे. परंतु त्यांनी मांडलेल्या त्या व्हीजनवर अंमलबवाणी करण्यात आपण अपुरे पडलो, असे प्रतिपादन केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे काढण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर - द आर्किटेक्ट आॅफ मॉडर्न इंडिया या गौरव ग्रंथाचे लोकार्पण रविवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामागील प्रांगणात नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, योजना आयोगाचे माजी सदस्य व गौरव ग्रंथाचे अतिथी संपादक डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले प्रामुख्याने उपस्थित होते.नितीन गडकरी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंचनापासून तर शेतीपर्यंत आणि उद्योगापासून तर नदीजोडणीपर्यंत अनेक विषयावर आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या विचारांवर त्या काळात गांभीर्याने लक्ष दिले गेले असते तर आज देशाचे चित्र वेगळे असते. त्यांनी नदी वाहतुकीबाबतही सांगितले होते. त्यांच्या विचारानुसार चाललो असतो तर एकट्या नदी वाहतुकीद्वारेच देशाचा विकास दर साडेतीन टक्केपर्यंत वाढला असता. नदी जोड प्रकल्पाबाबतही त्यांनी सांगितले आहे. मी या दोन्ही खात्याचा मंत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारानुसार आपले काम सुरू आहे. येत्या दोन वर्षात देशात जलवाहतूक मोठ्या प्रमााणावर सुरू झाल्याचे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी गौरवग्रंथाचे संपादक डॉ. मधुकर कासारे यांनी ग्रंथावर भाष्य केले. प्रास्ताविक कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनी केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले.या देशाला बाबासाहेब समजलेच नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशात जन्मले हे या देशाचे सुदैव आहे. पण या देशाला बाबासाहेब समजले नाही, हे या देशाचे मोठे दुर्दैव आहे, असे स्पष्ट मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. या देशाने बाबासाहेबांची नेहमीच अवहेलना केली. त्यांना अपमानाशिवाय काहीच दिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीरपणे मोठे गोडवे गायले जातात. पण आजही या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आत्मसात करता आले का किंवा आत्मसात करण्याच्या तयारीत आहे का, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही, असेच आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.नितीन गडकरी हे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून प्रशासनिक दृष्टीने धोरण राबवणारी एक धाडसी व्यक्ती आहे. त्याबद्दल आपल्याला त्यांचा आदर आहे, असे गौरवोद्गारही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी काढले.दोन तास उशीर, श्रोत्यांनी व्यक्त केली नाराजीगौरव ग्रंथ लोकार्पण कार्यक्रमाची वेळ ही ६.३० वाजताची होती. कार्यक्रमासाठी नागपुरातील आंबेडकरी समाजातील लोक व श्रोते मोठ्या संख्येने आले होते. अनेक जण ग्रंथ विकत घेण्यासाठी ५ वाजेपासून आले होते. नितीन गडकरी हे त्याच वेळी एका दुसºया कार्यक्रमात होते. त्यामुळे त्यांना उशीर होणार हे साहजिकच होते. परंतु त्यांनी कार्यक्रम सुरू करा मला यायला उशीर असल्याचे आयोजकांना आधीच कळविले होते. ८ वाजले तरी कार्यक्रम सुरू झाला नसल्याने श्रोते संतापले. अनेक श्रोत्यांनी आयोजकांकडे आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आणि निघून गेले. अखेर पुढच्या कार्यक्रमातून गडकरी निघाले असा मॅसेज आला तेव्हा कुठे ८.२० मिनिटांनी कार्यक्रम सुरू करण्यात आला. श्रोत्यांची आयोजकांबद्दलची नाराजी मात्र कायम होती.