शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अड्ड्यावर सर्व सुविधा

By admin | Updated: August 13, 2014 00:47 IST

जुगार अड्ड्यावर खाण्यापिण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. लकडगंज आणि आजूबाजूच्या पोलिसांनाही महिन्याला लाखो रुपये मिळतात. त्यामुळे या जुगार अड्ड्याकडे पोलीस जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करतात.

नागपूर : जुगार अड्ड्यावर खाण्यापिण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. लकडगंज आणि आजूबाजूच्या पोलिसांनाही महिन्याला लाखो रुपये मिळतात. त्यामुळे या जुगार अड्ड्याकडे पोलीस जाणीवपूर्वकच दुर्लक्ष करतात. नव्यानेच रुजू झालेल्या परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांना या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली. मात्र, कारवाई करण्यापूर्वीच बावाजीकडे बातमी पोहोचू शकते, ही भीती असल्यामुळे पद्धतशीर सापळा रचण्यात आला. परिमंडळ १ चे उपायुक्त अभिनाश कुमार यांनी धाडीची योजना आखली. आज पहाटे २.४५ वाजता पोलिसांचा ताफा घेऊन उपायुक्त अभिनाश कुमार आणि उपायुक्त निर्मला देवी यांनी अशोक बावाजीच्या अड्ड्यावर धाड घातली. यावेळी येथे देवेंद्र रामभाऊ आखरे (वय ५१, बुधवारी, पिवळी मार्बतजवळ), रमेश गणपती पुणेकर (वय ४२, रा. गोळीबार चौक, पसारकर मोहल्ला), मनोज ज्ञानचंद जैन (वय ४७, रा. वर्धमाननगर), ईश्वर लोटन गौर (वय ३४, रा. हंसापुरी छोटी खदान), दिनेश भरतलाल जैन (वय ४७, रा. लालनगर), नरेश सुरेश हिवराळे (वय २७, रा. जागनाथ बुधवारी), शेख आबीद शेख युसूफ (वय ३१, रा. सतरंजीपुरा), महेश चंपालाल यादव वय ३७, रा. नयापुरा), अमित हिरालाल गुप्ता (वय ३५, रा. चाफेकर चक्कीजवळ, शेंडेनगर), मोहम्मद शफी अब्दुल मुनाफ (वय ४८, टेका आशीनगर), रिजवान हसन कुरेशी (वय ३३, रा. जाफरनगर), मोहम्मद जावेद मोहम्मद शकूर (वय ३३, रा. नवाबपुरा), आनंद श्रीवास्तव (वय ४१, रा. लालगंज खैरीपुरा), अजय कमलप्रसाद शुक्ला (वय ३८, रा. महेंद्रनगर), फिरोज खान मंजूर खान (वय ३३, रा. महेंद्रनगर), शहादीप मोहम्मद शकील (वय ३४, रा. जागनाथ बुधवारी), मोहम्मद इमरान मोहम्मद रशीद (वय २३, रा. अनंतनगर), रिजवान खान बहादूर खान (वय ४२, रा. शांतिनगर), प्रेमलाल रतनलाल अहीर (वय ३७, रा. बस्तरवारी नागोबा मंदिराजवळ), नारायण तुळशीराम खापेकर (वय ४३, रा. पाचपावली पहिला रेल्वे फाटक जवळ), राजेश सुरेश साधनकर (वय ३४, रा. यादवनगर), धीरज श्यामलाल ठाकूर (वय ३२, रा. आशीर्वादनगर, हुडकेश्वर रोड), मनोज कृष्णराव डोमारकर (वय ३६, रा. टिमकी, भानखेडा), शेख याकत अली शेख गुलाब अली (वय ५१, रा. अवस्थीनगर, गिट्टीखदान), दुर्गेश गणेश डागोर (वय २९, रा, गंजीपेठ, गणेश चौक), रफीक खान अजीज खान (वय २७, रा. जाफरनगर, गिट्टीखदान), सुशील रामदास शिर्के (वय २७, रा. त्रिमूर्तिनगर), श्रीकांत रामकृष्ण जगनाडे (वय ३९, रा. जुनी शुक्रवारी) यांना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ६ लाख १२ हजार २६० रुपयांची रोकड, २७ मोबाईल, ५ दुचाकी, एलसीडी आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. (प्रतिनिधी)