शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयकुमार काळे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

By admin | Updated: March 20, 2016 03:00 IST

विख्यात काव्य समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांना महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमीचा सेतुमाधवराव पगडी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सेतूमाधवराव पगडी पुरस्कार बुधवारी होणार प्रदान नागपूर : विख्यात काव्य समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांना महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमीचा सेतुमाधवराव पगडी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘गालिबचे उर्दु काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार २३ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालयासमोर, मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. या ग्रंथासाठी सातत्याने पाच वर्षे आपण परिश्रम केले. या ग्रंथाला रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या तर या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली आहे आणि दुसरी आवृत्ती काढण्याचा विचार सुरू आहे. उर्दु आणि मराठीची सेवा करण्यासाठी हा पुरस्कार मला मिळाला. याशिवाय केलेल्या परिश्रमाचा आदर या पुरस्कारामुळे झाल्याचे मला समाधान आहे, अक्षयकुमार काळे म्हणाले. गालिबच्या नावाने अनेक शेर खपविले जातात. अनेकांनी गालिबचे शेर वाचलेलेच नसतात त्यामुळे गालिबच्या शेरोशायरीबद्दल अनेकांमध्ये गोंधळ उडतो. सरधोपट गालिबच्या नावावर शायरी खपविली जाते. या पुस्तकामुळे मात्र गालिबच्या नावावर काहीही खपविले जाऊ शकत नाही. गालिबचे शेर या पुस्तकाच्या माध्यमातून सहज ओळखले जाऊ शकतात. कारण या पुस्तकात रदीफनुसार सूची देण्यात आली आहे. कुठल्या गझलेचा तो शेर आहे, हे देखील या सूचीतून ओळखता येते. यानंतर गालिब चरित्र आणि काव्यविवेचन हा ग्रंथ सध्या लिहित आहेत, असे मत त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केले. (प्रतिनिधी)