शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आयएमएससाठी अजनीचा पर्याय तांत्रिकदृष्ट्या चुकीचा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:11 IST

नागपूर : महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी अजनी रेल्वे काॅलनीच्या जागेचा पर्याय तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला ...

नागपूर : महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी अजनी रेल्वे काॅलनीच्या जागेचा पर्याय तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला आहे. एकतर आयएमएसचे विमानतळाशी कनेक्शन नाही व दुसरीकडे आंतरिक किंवा बाह्य रिंग राेडशीही हे टर्मिनल जुळलेले नाही. अशावेळी माेठ्या प्रमाणात बाहेरील व आतील वाहनांचे आवागमन शहरातून हाेईल. त्यामुळे शहराच्या मधाेमध वाहतुकीचा गाेंधळ उडण्याची आणि प्रदूषणाचा स्तर वाढण्याची शक्यता आहे.

आर्किटेक्ट व पर्यावरण वारसा अभ्यासक संदीप पथे यांनी सांगितले, आधीच अजनी ते मेडिकल चाैक ते गणेशपेठ बसस्थानकापर्यंत वाहतुकीचा प्रचंड खाेळंबा निर्माण हाेत असताे. एनएचएआयच्या प्रस्तावित आयएमएसनुसार मेट्राे, ब्राॅडगेज रेल्वेसह १६३ बस फलाट, खासगी बसेस व १२०० कार्स राहतील असे स्टॅंड तयार करण्यात येणार आहे. विमानतळ जवळ नसल्याने त्यासाठी वेगळा पर्याय तयार करावा लागेल. दुसरीकडे आऊटर रिंग राेड येथून फार लांब असल्याने बाहेर राज्यातील प्रवासी वाहतूक बाहेरूनच वळविणे अशक्य हाेईल. शहराच्या मधाेमध एवढ्या माेठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांमुळे काय परिस्थिती निर्माण हाेईल, याचा विचार हाेणे गरजेचे आहे. पत्रपरिषदेत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ शरद पालिवाल, अनसूया काळे-छाबरानी, जयदीप दास, कुणाल माैर्य आदी उपस्थित हाेते.

- झाडांचा सवाल आहेच

आयएमएसच्या पहिल्या टप्प्यात ४४ एकरांतील ७००० झाडे ताेडली जाणार आहेत. इतर तीन टप्प्यात ४९० एकरांमध्ये हा प्रकल्प साकारला जाणार असून त्यात ४० हजारांवर झाडांची कत्तल होईल. हे मूल्य भरून काढणे शक्य नसल्याचे जयदीप दास म्हणाले.

खापरी हाच सर्वाेत्तम पर्याय

- नागपूर रेल्वेस्थानकावरून दरराेज २२४ गाड्यांची ये-जा हाेते. त्यापैकी २०० गाड्या अजनीहून आणि पर्यायाने खापरीहूनही चालतात.

- येथे मेट्राे स्टेशन आहे. ब्राॅडगेज मेट्राेही सुरू हाेऊ शकते. आंतरराष्ट्रीय विमानतळही जवळ आहे.

- आऊटर रिंग राेड अगदी जवळ आहे. आऊटर रिंग राेडशी राष्ट्रीय महामार्ग ४४, ४७, ५३ तसेच राज्य महामार्ग क्रमांक ३, २४८, २५५ व २६४ जुळलेले आहेत. यातून इतर महामार्ग जाेडून बाहेरील वाहतूक शहराबाहेरूनच वळविता येते.

- इतर शहरातील आयएमएस

अमेरिका, इंग्लंड, नेदरलॅन्ड या देशातील शहरात माॅडेल स्टेशन बनलेले आहेत. ते १२ ते ३० एकरात तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे ते सर्व शहराच्या बाहेर आहेत. याशिवाय चेन्नईचे आशियातील सर्वात माेठे बस टर्मिनल ३७ एकरात, दिल्लीचे सर्वाधिक व्यस्त बस टर्मिनल २५ एकरात व हैदराबादचे ३० एकरात आहे. अशावेळी नागपूरसारख्या ठिकाणी शहराच्या आतमध्ये ४९० एकरात आयएमएस साकार करण्याचा पर्याय व्यावहारिक नसल्याचे अनसूया काळे म्हणाल्या. दुर्दैवाने खापरीबाबत सर्वेक्षण व ॲनालिसिस केले नसल्याची टीका त्यांनी केली.

अजनीत कलादालनाचा पर्याय

अजनी पर्यावरणीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अजनी आर्ट स्थळ म्हणून विकसित केले जाऊ शकते. चेनई, लाेधी आर्ट दिल्ली, कालाघाेडा मुंबई व काेच्छी येथील आर्ट डिस्ट्रिक्टप्रमाणे रचनात्मक केले जाऊ शकते. शहराच्या मध्यभागी वसलेले एक मनोरंजन केंद्र निर्माण हाेऊ शकते. या उत्क्रांतीत स्ट्रीट आर्ट, वॉल पेंटिंग, भित्तिचित्र कला प्रतिष्ठापने आणि समुदाय समावेशी क्रियाकलाप समाविष्ट आहेत. बंगले तात्पुरते किंवा कायमस्वरूपी विविध ब्रँड आणि आर्ट गॅलरीवर भाड्याने देता येतात. याचे प्रात्यक्षिक संदीप पथे यांनी सांदर केले.