शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अजनी होईल सॅटेलाईट टर्मिनल

By admin | Updated: February 26, 2016 02:54 IST

रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासभाडे, मालभाडे वाढविण्यात न आल्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे.

प्रभूंची ‘सुविधा’ एक्स्प्रेस नागपूरसाठी लाभदायक : खापरी, गोधनी, माजरीला आदर्श स्टेशनचा दर्जानागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासभाडे, मालभाडे वाढविण्यात न आल्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. नागपूरकरांसाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे अर्थसंकल्पात अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन या स्थानकाचा विकास करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी ४१.६२ कोटी रुपये खर्च येणार असून या अर्थसंकल्पात १ लाख रुपयांची तरतूद करण्यात आहे. याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (इरिएट) या संस्थेची घोषणा मागील अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या संस्थेसाठी २६ लाखाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.रेल्वे अर्थसंकल्पात खापरी, गोधनी, माजरी रेल्वेस्थानकांना आदर्श रेल्वेस्थानक बनविण्याची घोषणा करण्यात आली आहे. ७५ कोटी ७३ लाख ३ हजार कोटीच्या या प्रकल्पासाठी मात्र फक्त १ रुपये निधीची तरतुद करण्यात आली आहे. घोषणा करण्यात आलेल्या आदर्श स्थानकावर जास्तीत जास्त प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यात गोधनी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मची उंची वाढविण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पात ११ रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीमच्या प्रकल्पानुसार १० कोटी ८८ लाख ९२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या ११ रेल्वेस्थानकात नागपूर रेल्वेस्थानकाचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक १, २, ३ वर इटारसी एण्डकडे आधुनिकीकरणासाठी ९ कोटी ५६ लाख २० हजार रुपयांच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. त्यासाठी सध्या रकमेची तरतूद करण्यात आलेली नाही. रेल्वेस्थानकावर इटारसी एण्डकडे १ ते ८ पर्यंत सर्व प्लॅटफार्मच्या फूट ओव्हरब्रीज आणि प्लॅटफार्म दरम्यान शिडी आणि लिफ्टसाठी ९ कोटी ५६ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.