शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

एम्स, आयआयएमला मिळाली जागा

By admin | Updated: October 29, 2015 03:13 IST

नागपुरातील मिहान प्रकल्पात स्थापन करण्यात येणाऱ्या ‘एम्स’ आणि ‘आयआयएम’ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

एमएडीसीने दिले जागा वाटपाचे पत्र : ‘एम्स’ १५० व ‘आयआयएम’ला १४२ एकर जागानागपूर : नागपुरातील मिहान प्रकल्पात स्थापन करण्यात येणाऱ्या ‘एम्स’ आणि ‘आयआयएम’ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) बुधवारी दोन्ही संस्थांना मिहानमध्ये जागा वाटपाचे पत्र एका छोटेखानी समारंभात सोपविले. एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी हे पत्र एम्सचे प्रतिनिधी व नागपूर एम्सचे नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण आणि आयआयएमचे प्रतिनिधी व प्रकल्प प्रशासक ले. कर्नल (निवृत्त) मकरंद अलूर यांना सोपविले. यावेळी जिल्हाधिकारी आणि एमएडीसीचे संयुक्त संचालक सचिन कुर्वे, एमएडीसीचे सल्लागार (तांत्रिक) एस.व्ही. चहांदे, मुख्य अभियंता एस.के. चॅटर्जी, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, अशोक चौधरी, आभा पठाण, एमएडीसीचे वरिष्ठ आर्किटेक्ट सी. बनकर, मार्केटिंग मॅनेजर अतुल ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, सहायक नगर रचनाकार दिगांबर लुंगरे आणि सल्लागार (इलेक्ट्रिकल्स) केशव इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते. मिहानमध्ये एम्स १५० एकर आणि आयआयएम १४२ एकरमध्ये स्थापन होणार आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकारतर्फे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून एम्सची स्थापना करण्यात येत आहे. याच प्रकारे राष्ट्रीय स्तरावर ख्यातिप्राप्त व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ला नागपुरात स्थापन करण्यात येत आहे. एम्स आणि आयआयएमने प्लॉटची आखणी आणि संयुक्त मोजणीचे काम लवकरच पूर्ण करून एमएडीसी आणि अन्य संबंधित प्राधिकरणाकडून मंजूर प्राप्त करून इमारत तयार करण्यासंदर्भात आवश्यक प्लॅन तयार करण्याचे आवाहन एमएडीसीने जागेच्या वाटप पत्रात केले आहे.(प्रतिनिधी)फडणवीस, गडकरी लवकरच देणार कब्जा पत्रएम्स आणि आयआयएमला मिहानमध्ये जमिनीचे कब्जा पत्र मुख्यमंत्री आणि एमएडीसीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री आणि मिहान टास्क फोर्सचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. एम्सला मेडिकल टीचिंगचे मॉडेल आणि मेडिकल रिसर्च सेंटरच्या स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे, तर मॉडेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या स्वरूपात आयआयएमचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार जमिनीसह रस्ते, पाणी, वीज, सरकारी मंजुरीसह आणि अन्य सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.