शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जाहीरनाम्यात हवा दलित विकासाचाही अजेंडा

By admin | Updated: September 6, 2014 03:02 IST

महायुतीमध्ये रिपाइं हा महत्त्वाचा घटक असून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दलितांनी भरघोस मतदान केले आहे.

नागपूर : महायुतीमध्ये रिपाइं हा महत्त्वाचा घटक असून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दलितांनी भरघोस मतदान केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये दलित विकासाचा अजेंडा सुद्धा सामील करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केली.एका कार्यक्रमासाठी आठवले शुक्रवारी नागपुरात आले असता रविभवनात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. काँग्रेसने सन्मानाची वागणूक न दिल्यामुळेच आपण भाजपा-शिवसेनेशी युती केली आहे. रिपाइं युतीमध्ये सामील झाल्यावरच ती महायुती झाली आहे. तेव्हा जागा वाटप करताना काँग्रेससारखी भूमिका न घेता भाजप-सेनेने योग्य निर्णय घेत सन्मान राखावा, अशी अपेक्षासुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महायुतीचा जाहीरनामा तयार करीत असताना दलित विकासाचा अजेंडा असावा त्यात खासगी क्षेत्रात आरक्षण, भूमिहिनांचा प्रश्न, महामंडळाच्या वित्त मदतीमध्ये वाढ, जमिनीचे राष्ट्रीयीकरण, प्रत्येक भूमिहिनांना ५ एकर जमीन आदी प्रश्नांचा समावेश करण्यात यावा. रिपाइंमध्ये सध्या अनेक लोक येण्यास उत्त्सुक आहेत. विविध क्षेत्रातील लोकांनी पक्षात प्रवेश घेतला आहे. अभिनेत्री राखी सावंत, माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे हे पक्षात आले असून लवकरच अनेक माजी सनदी अधिकारी पक्षात येणार आहेत. या सर्वांचा लाभ पक्षाला निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारताला नुकतेच अव्हान दिले असून भारतानेसुद्धा त्यांना जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, राजू बहादुरे, राजन वाघमारे, बाळू घरडे, आर.एस. वानखेडे, प्रा. पवन गजभिये, रवी शेंडे आदी उपस्थित होते.