शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

अग्रवालने पोलिसांना दिले खेळण्याचे पिस्तूल

By admin | Updated: August 14, 2016 02:50 IST

हजारो कोटींच्या डब्बा सट्टेबाजीचा सूत्रधार रवी अग्रवाल याने गोळीबार प्रकरणात सारवासारव करताना पोलिसांच्या हाती खेळण्याचे पिस्तूल (टॉय गन) दिले.

म्हणे गंमत म्हणून केली ‘फिल्मी फायरिंग’ : व्हिडीओ क्लीप बाबत मौन नागपूर : हजारो कोटींच्या डब्बा सट्टेबाजीचा सूत्रधार रवी अग्रवाल याने गोळीबार प्रकरणात सारवासारव करताना पोलिसांच्या हाती खेळण्याचे पिस्तूल (टॉय गन) दिले. व्यवसायात मोठा आर्थिक फटका बसल्यामुळे आपली मानसिक अवस्था बिघडली होती. त्यातून आपण दोन वर्षांपूर्वी याच खेळण्याच्या पिस्तुलातून गंमत म्हणून ‘फिल्मी फायरिंग‘ केली होती, अस त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. विशेष म्हणजे, अग्रवालने दिलेले पिस्तूल अन् बयान घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. त्यामुळे या प्रकरणाची हवा आणखीच गरम झाली आहे. समांतर शेअर मार्केट चालवून हजारो कोटींची सट्टेबाजी करणाऱ्या रवी अग्रवालचा डब्बा व्यापार उजेडात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या ठिकठिकाणच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापे घातले. त्याच्या भावासह काही साथीदारांनाही अटक केली. तो मात्र फरार झाला. तब्बल अडीच महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या रवी अग्रवालला अटकपूर्व जामीन मिळाला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याचा आणि साथीदार गोपी मालू याचा हवेत गोळीबार करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर अग्रवाल आणि मालू या दोघांविरुद्ध शुक्रवारी कळमना पोलिसांनी गोळीबार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. मात्र, अग्रवालने येथेही पोलिसांच्या पुढचे पाऊल टाकले. अटक करण्यापूर्वीच अग्रवालने गुन्हेशाखा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावे पत्र दिले. आपण गंमत म्हणून खेळण्याच्या पिस्तुलातून ‘फिल्मी फायरिंग‘ केल्याचे त्याने सांगितले. परिमंडळ पाचचे उपायुक्त अभिनाश कुमार यांची भेट घेऊन अग्रवालने आपले बयान दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्याने व्हिडीओ क्लिपमध्ये (सारखे) दिसणारे माउझर (पिस्तूल) पोलिसांना दिले. कळमन्यातील आपल्या आलिशान निवासस्थानाच्या टेरेसवरून रवी अग्रवाल आणि त्याचा साथीदार गोपी मालू या दोघांनी दोन माउझर हातात धरून गोळ्या झाडल्या. गोळी झाडताना मालू याने ‘हमारे दुश्मनोंको लगता था के अब हम कभी बाहर (पोलिसांच्या कस्टडीतून) आ नही सकते... ये उनके नाम...!‘ असे म्हणत गोळी झाडली, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये दिसते. सूत्रांच्या माहितीनुसार, अग्रवालने ही ‘फिल्मी फायरिंग’ दोन वर्षांपूर्वी केल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते. अर्थात दोन वर्षांपूर्वी अग्रवाल आणि गोपी कोणत्या केसमध्ये अडकला होता आणि तो पुन्हा कसा बाहेर येणार नव्हता, हे तपासण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. तूर्त पोलिसांनी बयान नोंदविल्यानंतर त्याला मोकळे केले आहे. व्हिडीओ क्लीप आणि त्यातील वक्तव्याबाबत अग्रवालच्या बयानावर पोलिसांनी तूर्त विश्वास केल्याने चर्चेचा बाजार गरम झाला आहे.(प्रतिनिधी) निवासस्थानाची केली तपासणी सूत्रांच्या माहितीनुसार, अग्रवाल आणि मालूने ही ‘फिल्मी फायरिंग’ कळमन्यातील मिनी माता नगरात असलेल्या अग्रवालच्या स्कायलाईन इमारतीतील आलिशान निवासस्थानातून केली होती. पोलिसांनी या इमारतीचीही तपासणी केली आहे. मालू गेला गोवा सफरीवर या खळबळजनक प्रकरणाचा बोभाटा होताच अग्रवालचा साथीदार गोपी मालू गोवा सफरीवर गेल्याची चर्चा आहे. या संबंधाच्या विस्तृत माहितीसाठी पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल ‘नो रिप्लाय’ होता. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीबाबत माहिती उघड होऊ शकली नाही.