शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एका कैद्याचा मृत्यू

By admin | Updated: July 12, 2016 03:04 IST

मध्यवर्ती कारागृहातील पुन्हा एका व्याधिग्रस्त कैद्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला. भीमराव सखाराम बुधे (वय ५६) असे मृत

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील पुन्हा एका व्याधिग्रस्त कैद्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला. भीमराव सखाराम बुधे (वय ५६) असे मृत कैद्याचे नाव आहे. तो भंडारा जिल्ह्यातील रहिवासी होता.खुनाच्या आरोपात बुधेला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. काही वर्षे औरंगाबादच्या कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर बुधेला तेथून १ जानेवारी २०१० ला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून तो येथे बंदिस्त होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला अल्सरचा त्रास होत होता. गेल्या आठवड्यात हा त्रास वाढल्याने बुधेची प्रकृती खालावली. त्यामुळे ७ जुलैला त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा रविवारी रात्री १०.५० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. विविध व्याधींनी त्रस्त कैद्याचा मृत्यू होण्याची दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. १ जुलैला रात्री अशाच प्रकारे अंडरवर्ल्डमधील शार्प शूटर रवींद्र सावंतचा मृत्यू झाला होता.(प्रतिनिधी)