शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यानंतर व्यक्तिश: चौकशी

By admin | Updated: September 11, 2016 02:14 IST

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने आवश्यक ती कागदपत्रे मागवून घेतली

झोटिंग चौकशी प्रकरण : अधिकारी येणार, खडसेंबद्दल अनिश्चिततानागपूर : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने आवश्यक ती कागदपत्रे मागवून घेतली असून पुढील दोन आठवड्यांत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. प्रकरणातील संबंधित अधिकारी चौकशी समितीला सामोरे जातील. परंतु खडसे यांना चौकशी समितीसमोर बोलावण्यात येईल किंवा नाही, याबाबत मात्र अनिश्चितता आहे.पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीवरून खडसे यांच्यावर आरोप होते. त्यामुळे त्यांना जूनमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी न्या. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. नागपूर येथील रविभवनातून या समितीचे चौकशीचे काम सुरू आहे. तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात चौकशी समितीचे कार्यालय सुरू होऊन दोन महिने लोटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चौकशी समितीने आतापर्यंत जमीन खरेदी व्यवहारातील कागदपत्रे मागविली आहेत. काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पत्रेही पाठविण्यात आली आहेत. अजूनपर्यंत व्यक्तिश: चौकशीला सुरुवात झालेली नाही. दोन आठवड्यांत या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. चौकशी समितीचे काम नागपुरातून सुरू असल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. चौकशी समिती नुकतीच पुणे आणि मुंबईत जाऊन आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कागदपत्रे सुद्धा तपासण्यात आली आहेत. दोन आठवड्यानंतर व्यक्तिश: सुनावणीला सुरुवात होणार आहे. सूत्रांनुसार खडसे यांना गरज पडली तेव्हाच पाचारण केले जाईल. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना मात्र चौकशी समितीला सामारे जावे लागणार आहे.(प्रतिनिधी)