शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षानंतरही निर्वाह भत्ता ४५० रूपयेच

By admin | Updated: September 7, 2014 00:49 IST

आदिवासी युवकांना एसटीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने विदर्भातील दोन ठिकाणी आदिवासी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. प्रशिक्षणार्थ्यांना १९९६ पासून केवळ ४५०

आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्ष : प्रशिक्षणार्थी सोडून जातातदिगांबर जवादे - गडचिरोलीआदिवासी युवकांना एसटीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने विदर्भातील दोन ठिकाणी आदिवासी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. प्रशिक्षणार्थ्यांना १९९६ पासून केवळ ४५० रूपये निर्वाहभत्ता दिला जात आहे. मागील १८ वर्षात महागाई पाच पटीने वाढली असली. मात्र निर्वाह भत्त्यात रूपयाचीही वाढ झाली नाही. एसटी महामंडळात वाहन चालक म्हणून नोकरी मिळविण्यासाठी जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. मात्र आदिवासी युवकांकडे असा परवाना राहत नसल्याने १९९५ मध्ये एसटीत अनुसूचित जमातींचा अनुशेष ५० टक्क्यांच्या जवळपास वाढत गेला होता. हा अनुशेष भरून निघावा, तसेच रोजगाराची संधी मिळावी यासाठी १९९६ साली यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व गडचिरोली येथे आदिवासी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्राचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभागाकडून उचलण्यात येतो. प्रशिक्षण देण्याचे काम एसटी प्रशासनाकडून करण्यात येते. प्रशिक्षणार्थ्यांना भोजन खर्च म्हणून १९९६ पासून ४५० रूपये मासिक मानधन दिल्या जात आहे. त्यावेळी ४५० रूपयांत भोजनासह इतर खर्च भागविणे सहज शक्य होते. १८ वर्षात महागाई आकाशाला भिडली. मात्र निर्वाह भत्त्यात वाढ झाली नाही. आता प्रशिक्षणार्थ्यांना महिन्याला दोन हजार रूपये खर्च येतो. हा खर्च स्वत: करावा लागत असल्याने प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी मिळणे, कठीण झाले आहे. प्रशिक्षणानंतर चालकाचा रोजगार मिळेल अशी अपेक्षा बाळगून भामरागड, सिरोंचा, धानोरा तालुक्यातील आदिवासी गरीब युवक प्रशिक्षणाला प्रवेश घेत आहेत. मात्र शहरात राहण्याचा खर्च त्यांना परवडणारा नसल्याने अनेक युवक १-२ महिन्यातच प्रशिक्षण सोडून जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आदिवासी विकास विभागाला केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी प्राधान्याने प्राप्त होतो. त्यामुळे विभागाकडे निधीची कमतरता नाही. किमान मासिक ३ हजार रूपये निर्वाह भत्ता द्यावा, अशी मागणी प्रशिक्षणार्थ्यांकडून केली जात आहे. पांढरकवडा येथे २५ एकरात भव्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली असली तरी गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्यात प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवासी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. १ सप्टेंबर पासून प्रशिक्षण सुरू झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पहिलीच रात्र जागून काढावी लागली.