शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मुजोर तरुणांना सल्ला देणे महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या एका आरोपीला नीट गाडी चालवण्याचा सल्ला देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या एका आरोपीला नीट गाडी चालवण्याचा सल्ला देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. त्या आरोपीने क्षुल्लक कारणावरून आपल्या साथीदारांसह सल्ला देणाऱ्या आणि त्यांच्या एका मित्रावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नबाबपुऱ्यातील राममंदिराजवळ शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली.

मकरंद किशोर किटकरू (वय ३४) हे त्यांच्या घराजवळ शनिवारी रात्री मित्र धनंजय जुमळेसह बसून गप्पा करीत होते. तेवढ्यात आरोपी नीरज लारोकर हा वेगात वाहन चालवत आला. मकरंद यांनी त्याला नीट गाडी चालव असे म्हटले. त्यावरून आरोपीने मकरंद यांच्याशी वाद घातला. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर आरोपी लारोकरने त्याचे साथीदार क्रिश चाैधरी, तुशार कंकाळ, आदर्श वैद्य, सोहेल शेख, वृशभ बेंद्रे आणि अन्य दोन ते तीन साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलवून घेतले. साथीदार तेथे आल्यानंतर आरोपी लारोकरने धनंजय यास विट फेकून मारली. नंतर त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच कोतवाली पोलीस पोहचले. मकरंद यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---