शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

आॅनलाईनमध्ये अडली शिष्यवृत्ती

By admin | Updated: April 17, 2017 02:03 IST

अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या

सुवर्ण जयंती आदिवासी शिष्यवृत्तीचे वाटप रखडले मंगेश व्यवहारे   नागपूर अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने ‘सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती’ देण्यात येते. दोन वर्षांपूर्वी या शिष्यवृत्तीची कार्यप्रणाली आॅनलाईन झाल्याने योजनेचा लाभच विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना २०१०-११ पासून सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत आदिवासी १ ते ५ वर्गासाठी १००० रुपये व ६ ते १० या वर्गासाठी १५०० रुपये शिष्यवृत्ती मिळत असल्याची माहिती आहे. पूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय संबंधित मुख्याध्यापकांच्या नावे या शिष्यवृत्तीचा धनादेश पाठवीत होते. हा धनादेश वटवून लाभार्थी विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्याची जबाबदारी संबंधित शाळांची होती. मात्र, शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी अनेकवेळा परस्पर तो आपल्या खात्यात जमा करून या शिष्यवृत्तीची रक्कम परस्पर खर्च करीत असल्याने लाभार्थी योजनेपासून वंचित राहत असल्याची ओरड होत होती. त्यामुळे शासनाने ही योजना आॅनलाईन करून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. परंतु आॅनलाईनमुळे या योजनेलाच ग्रहण लागले. दोन सत्र संपल्यानंतरही आॅनलाईन प्रक्रिया दुरुस्त करण्यात आली नाही. आदिवासींच्या बाबतीत गांभीर्यच नाही योजना आॅनलाईन नव्हती तेव्हाही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत होते. आता आॅनलाईन झाल्यानंतरही हीच अवस्था आहे. शिष्यवृत्तीसाठी शाळा आदिवासी विभागावर व विभाग शाळांवर हे प्रकवण ढकलत आहे. याचाच अर्थ कुणीच गंभीर नसल्याचे दिसून येत आहे