शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्रौढावस्थेतही लैंगिक आयुष्य रसिकवृत्तीने जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:26 IST

लैंगिक आयुष्य अनुभवणे हे निरोगी, निकोप जीवनाचे लक्षण आहे. परंतु जसजसे आपण वयाने प्रौढ होतो, तसतसे लैंगिक सुख घेण्याची गरज उरत नाही, असा एक गैरसमज निर्माण झालेला होतो.

ठळक मुद्देसंजय देशपांडे यांची माहिती : ‘सहजीवन चाळिशीनंतरचे’ संगीतमय चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लैंगिक आयुष्य अनुभवणे हे निरोगी, निकोप जीवनाचे लक्षण आहे. परंतु जसजसे आपण वयाने प्रौढ होतो, तसतसे लैंगिक सुख घेण्याची गरज उरत नाही, असा एक गैरसमज निर्माण झालेला होतो. मात्र, प्रौढावस्थेतसुद्धा लैंगिक आयुष्य रसिकवृत्तीने व समरसतेने जगणे आवश्यक आहे. गरज आहे या वयात आलेले लैंगिक न्यूनगंड संवादातून दूर करण्याची, अशी माहिती प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. संजय देशपांडे यांनी येथे दिली.स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात चाळिशीनंतर होणाºया शारीरिक व मानसिक बदलांबद्दल संगीतमय चर्चा ‘सहजीवन चाळिशीनंतरचे’आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विशेष सहभाग म्हणून मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक प्रा. डॉ. स्वाती धर्माधिकारी उपस्थित होत्या. रोटरी क्लब आॅफ नागपूर ग्रीन सिटीतर्फे आयोजित व ऋतुराज प्रस्तुत हा कार्यक्रम होता.डॉ. देशपांडे म्हणाले, लैंगिकता ही केवळ शरीराशी निगडित नसते तर ती मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिकदेखील गरज असते. दुर्दैवाने आपल्याकडे या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही. कुटुंबातही चर्चा होत नाही. परिणामी मनातल्या भावना मनातच कोंडून राहत असल्याने अनेक समस्या निर्माण होतात.या कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तापस यांची होती. निवेदन किशोर गलांडे यांनी केले. यावेळी गायक गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य-अय्यर, व मुकुल पांडे यांनी चर्चेला अनुरूप असे गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.चाळिशीनंतर ‘फिटनेस’वर लक्ष द्यावयाच्या चाळिशीनंतर पुरुष स्वत:च्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूक नसतात. उत्तम आरोग्य जोपासण्याबद्दल बेफिकीर असतात. शारीरिकदृष्ट्या फारसा ‘फिट’ नसलेला कोणताही पुरुष सततच्या शारीरिक श्रमाने लैंगिकजीवनात उत्तेजित होऊ शकत नाही. यामुळे ‘फिटनेस’कडे विशेष लक्ष द्या, असे डॉ. देशपांडे म्हणाले.‘अनअट्रॅक्टिव्ह’ राहू नकाडॉ. धर्माधिकारी म्हणाल्या, चाळिशीनंतर व्यावसायिक व सामाजिक जीवनातील व्यग्रता वाढते. कुटुंबाचे संवर्धन ही एक मोठी जबाबदारी पुरुष व स्त्रीवर आलेली असते. अशावेळी या वयामध्ये लैंगिक जीवनाबद्दल उदासीनता येऊ शकते. यातच ‘अनअट्रॅक्टिव्ह’ राहिल्यास लौंगिक जीवन लोप पावण्याची शक्यता असते. यामुळे या वयातही ‘अट्रॅक्टिव्ह’ राहा. एकमेकांचा आदर करा, असा सल्लाही त्यांनी दिला.शरीराचे व मनाचे संवर्धन कराडॉ. देशपांडे म्हणाले, तिशीतील लैंगिक ताकद चाळिशीत कमी झालेली असते. तो जोम, टवटवीतपणा कमी झालेला असतो. यामुळे अशा जोडप्यांनी आपल्या शरीराचे व मनाचे संवर्धन उत्साहीवृत्तीने करायला हवे. लैंगिक अनुभवामध्ये वैवाहिक जीवनातील कामोत्सुक वातावरण सदाबहार राहील, अशा पद्धतीची वातावरणनिर्मिती करायला हवी. स्पर्श व संवादावर जास्त भर द्यायला हवा.‘सेक्स’ टाळू नकाडॉ. देशपांडे म्हणाले, चाळीशीनंतर अनेकांना रक्तदाब, मधुमेहाचे निदान झालेले असते. याच वयात कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक जबाबदाºया वाढलेल्या असतात. यामुळे काहीवेळा लैंगिक विफलता, समर्पणभाव लोप पावतो. परिणामी, ‘सेक्स’ टाळण्याची वृत्ती वाढून दोघांमध्ये अंतर येते. तणाव वाढतो. निराशा येते. यामुळे दोघांनीही या विषयी बोलून आलेला न्यूनगंड दूर करणे आवश्यक आहे. ‘सेक्स’ला क्षाुल्लक समजू नये. ते दोघांच्या आरोग्यसाठी हिताचे असते.