शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेपुढे प्रशासन हतबल; गंभीर रुग्ण वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर काही महिने संक्रमण कमी झाले होते. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर काही महिने संक्रमण कमी झाले होते. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील दहा दिवसांपासून शहरात दर दिवसाला २५०० ते ३००० हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. २५ मार्चपर्यंत शहरात १ लाख ६७ हजार ५०० रुग्ण पॉझिटिव्ह झाले. होम आयासोलेशनमधील रुग्णांची संख्या २४ हजारांवर गेली आहे. महापालिका प्रशासन उपाययोजना करीत आहे; परंतु वाढत्या रुग्णांच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. गंभीर रुग्णांना भरती होण्यासाठी भटकंती करावी लागते. रुग्णालयात वेळीच बेड मिळत नाही. वेटिंगवर राहावे लागते. या संदर्भात प्रशासनाला धारेवर धरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गुरुवारी नगरसेवकांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेत केली.

शहरातील कोरोना संक्रमणाचा मुद्दा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला. शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात उपलब्ध बेड, लसीकरण व आरटीपीसीआर चाचण्यांसंदर्भात वस्तुस्थिती मांडण्याची मागणी केली. प्रफुल्ल गुडधे म्हणाले, बाधित रुग्णांना भरती व्हायचे असेल तर यंत्रणा सक्षम नाही. वेळीच बेड उपलब्ध होत नाही. मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा केला जात नाही. मनपा रुग्णालयात औषध मिळत नाही. यावर प्रशासनाने तात्काळ उपायोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

मेयो, मेडिकलमध्ये गंभीर रुग्णांना वेळीच बेड मिळत नाही. वेटिंगवर राहावे लागत असल्याचे आभा पांडे यांनी निदर्शनास आणले. नंदा जिचकार यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी जनजागृती करण्याची सूचना केली. दिव्या धुरडे यांनी मेयो, मेडिकलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणले. नितीन साठवणे यांनी खासगी रुग्णालयांकडून वारेमाप बिल काढले जात असून यावर मनपाचे नियंत्रण नसल्याचा आरोप केला. सुनील हिरणवार, जितेंद्र घोडेस्वार यांनीही कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले.