शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

सिंचनासोबतच आता मत्स्यपालनही

By admin | Updated: May 23, 2017 02:03 IST

नीलक्रांती धोरणांतर्गत सिंचनासोबतच मत्स्यपालनावर भर दिला जात आहे.

विभागीय आयुक्त अनुप कुमार : तलाव तेथे मासोळी अभियानाचा आज शुभारंभलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नीलक्रांती धोरणांतर्गत सिंचनासोबतच मत्स्यपालनावर भर दिला जात आहे. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या पुढकाराने या धोरणांतर्गत विभागीयस्तरावर तलाव तेथे मासोळी हे अभियान राबविले जात आहे. २३ मे रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथून या अभियानाला सुरुवात होत आहे. विभागातील २७४ महसूल मंडळामध्ये प्रत्येकी किमान १० तलावांवर मत्स्यजिरे ते बोटुकली संवर्धनाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, नागपूर विभागात गोड्या पाण्यातील भूजल क्षेत्रात मत्स्य व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. विभागात सुमारे ७ हजार ४१५ प्रकल्प तसेच माजी मालगुजारी तलाव असून यामध्ये १४ मोठे, ४९ मध्यम, ६१८ राज्य व स्थानिक लघु सिंचन प्रकल्प तसेच ६ हजार ७३४ माजी मालगुजारी तलाव मत्स्यसंवर्धनासाठी उपयुक्त असल्यामुळे विविध योजना एकत्रित करून मोठ्या प्रमाणात मत्स्यसंवर्धन घेणे शक्य आहे. अभियानांतर्गत प्रत्येक महसूल मंडळात किमान सहा तलावांमध्ये प्रति हेक्टरी ५ हजार बोटुकली याप्रमाणे १३ लक्ष ७० हजार बोटुकली संचय करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तलावांची निवड करणे तसेच जिल्हास्तरावरील उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर जून ते जुलै या कालावधीत मत्स्यजिरे ते बोटुकली संवर्धन करणे व आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत बोटुकली संचयन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना देण्यासोबतच अनुवांशिकदृष्ट्या सुधारित जातीच्या मासोळीचे संवर्धन करणे या माध्यमातून रोजगाराची निर्मिती तसेच खासगी मत्स्यसंवर्धन, शेततळीधारक, सामान्य शेतकरी, बचत गट आदींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘तलाव तेथे मासोळी’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य असून लाँगशिप कार्यक्रम म्हणून केंद्र व राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. अभियान मत्स्यव्यवसाय विकास विभाग, जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना, आदिवासी विकास विभाग, पीएसआर, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मनरेगा आदी योजना एकत्र करून हे अभियान यशस्वी करण्यात येणार आहे.विभागात १ लक्ष १० हजार हेक्टर गोड्या पाण्याचे क्षेत्र राज्यात सुमारे ३ लक्ष २२ हजार हेक्टर गोड्या पाण्यातील भूजल क्षेत्रापैकी नागपूर विभागात १ लक्ष १० हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून यामध्ये प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यात १२.७४ हेक्टर, गोंदिया २१.३३५ हेक्टर, चंद्रपूर १७.७५२ हेक्टर तर गडचिरोली जिल्ह्यात ८.६५० हेक्टर क्षेत्रामध्ये मत्स्य शेती करण्याकरिता चांगला वाव आहे. मच्छिमारी व्यवसायात पारंपरिक काम करणारे एकूण ४ लक्ष २७ हजार लोकसंख्या असल्यामुळे एका तलावात सरासरी दोन लाखांपेक्षा जास्त उत्पादन होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांचे उत्पन्न वाढविणे तसेच मानव विकास निर्देशांक उंचावण्यासोबत कुपोषण कमी करण्याला मदत मिळणार आहे.