नागपूर : अल्पसंख्यांक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी २०१६-१७ मध्ये प्रवेश घेतला. शासकीय नियमाप्रमाणे ते शिष्यवृत्ती व फ्री शिप करीता पात्र होते. परंतु शासनाने या विद्यार्थ्यांची फ्री शिप थांबविल्याने महाविद्यालयाने त्यांची टीसी व मूळ प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यार्थी पुढचे शिक्षण घेण्यास असमर्थ ठरले होते. यासंदर्भात रिपब्लिकन आघाडीतर्फे वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मंगळवारी समाजकल्याण आयुक्त नागपुरात आले असता, त्यांच्याशी भेटून चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रे देण्यासंबंधी महाविद्यालयाला आदेश देण्याचे उपायुक्त समाज कल्याण यांना आदेश दिले. जे महाविद्यालय विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र देण्यास नकार देतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे संजय पाटील, घनश्याम फुसे, संजय जीवने, निखिल कांबळे, सचिन गजभिये, सुदर्शन मून, अजय नंदनवार, शुभम तळेकर, संघर्ष नाईक आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे मुळ प्रमाणपत्र न देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST