शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन

By admin | Updated: March 15, 2017 02:25 IST

संदीप जाधव यांनी सांगितला विकासाचा अजेंडा, प्रगतिपथावरील प्रकल्पांसाठी निधी ;

संदीप जाधव यांनी सांगितला विकासाचा अजेंडा, प्रगतिपथावरील प्रकल्पांसाठी निधी ; उत्पन्न वाढीसाठी नियोजन नागपूर : उपराजधानी पुढील काही वर्षात देशातील टॉप स्मार्टसिटी होणार आहे. या दृष्टीने विकास कामे सुरू आहेत. परंतु ती जलद गतीने व्हावी, सोबतच शहराच्या सौंदर्यीकरणाला अधिक प्राधान्य देणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जाधव यांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी चर्चा करताना शहर विकासाचे ‘व्हीजन’ मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविलेल्या शहर विकासाच्या मार्गावर महापालिकेचा कारभार सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारकडून प्रथमच विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. परंतु शहर विकासात महापालिकेचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असल्याने आर्थिक स्थिती भक्कम करावी लागेल. ज्या-ज्या मार्गाने महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होतो, अशा विभागांचा क्रमवार आढावा घेऊ न नवीन आर्थिक स्रोत शोधण्याचा प्रयत्न राहील. महाल व सक्करदरा येथील बुधवार बाजार, आॅरेंज सिटी स्ट्रीट, सोख्ताभवन असे विकास प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. महापालिका आयुक्त २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावर अभ्यास करून एप्रिल महिन्यात स्थायी समितीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करू. प्रगतिपथावरील प्रकल्पांना निधीची कमतरता भासू नये यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात येईल, अशी माहिती जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी) दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महापालिका निवडणुकीत भाजपाने जाहीरनाम्याच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आश्वासने दिलेली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. पुढील पाच वर्षात त्याची पूर्तता होईल. अशी ग्वाही जाधव यांनी दिली. सिमेंट रस्त्यांसाठी १०० कोटी नागपूर शहरात ७२० कोटींचे सिमेंट रस्ते होत आहेत. तिसऱ्या टप्प्यात ३०० कोटींच्या रस्त्यांचा समावेश आहे. यात राज्य सरकार व नागपूर सुधार प्रन्यास तसेच महापालिकेचा प्रत्येकी १०० कोटींचा वाटा आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. शाळांचा दर्जा सुधारणार महापालिके च्या शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. सोबतच अत्याधुनिक साधनांचा वापर केला जाईल. यासाठी शिक्षकांना कामाला लावणार असल्याचे जाधव म्हणाले. तलाव व चौकांचे सौंदर्यीकरण स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. विकासोबतच सौंदर्यीकरणही तितकेच महत्त्वाचे आहे. याचा विचार करता शहरातील बगिचे, तलाव व प्रत्येक चौकांचे सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद ठेवली जाणार आहे. करवसुलीसाठी व्यापक मोहीम महापालिकेची र्आिर्थक स्थिती विचारात घेता, कर वसुलीसाठी व्यापक मोहीम राबविली जाणार आहे. शहरातील सर्व मालमत्तांवर कर आकारणी करून वसुली, तसेच जलप्रदाय, नगर रचना व बाजार विभागांच्या वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.