शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ठराविक कंत्राटदारांवरच कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 02:30 IST

रस्त्यावरील उखडलेले डांबर व खड्ड्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. यासाठी शहरातील नागरिक महापालिकेला जबाबदार मानत आहे.

उखडलेल्या रस्त्यांची चौकशी : अधिकाऱ्यांना मिळणार क्लीन चिटनागपूर : रस्त्यावरील उखडलेले डांबर व खड्ड्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. यासाठी शहरातील नागरिक महापालिकेला जबाबदार मानत आहे. महापालिका सभागृहातही या विरोधात विरोधी सदस्यांनी आवाज उठविला होता. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. अखेर महापौर प्रवीण दटके यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नगरसेवक व अधिकाऱ्यांची समिती गठित केली होती. समितीची चौकशी पूर्ण झाली आहे. परंतु समितीच्या चौकशी अहवालात ठराविक कंत्राटदारांना दोषी ठरवून अधिकाऱ्यांना क्लीन चिट मिळणार असल्याची माहिती आहे.महापौरांनी १५ दिवसात चौकशी करण्याचे निर्देश दिले होेते. परंतु समितीची घोषणा ११ दिवसानंतर करण्यात आली. स्थापत्य समितीचे सभापती सुनील अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करीत आहे. सोमवारी समितीकडून आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी दोषीवरील कारवाई निश्चित होणार आहे. उखडलेल्या रस्त्यांसाठी कंत्राटदारासोबतच उपअभियंता व अधिकारी जबाबदार आहेत. दोघांच्या संगनमताशिवाय निकृष्ट काम शक्य नाही. दायित्व कालावधी संपण्यापूर्वी जे रस्ते उखडलेले आहेत अशा रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात येईल. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची शक्यता नाही. यावर आक्षेत घेतलाच तर कंत्राटदारांना अतिरिक्त दंड आक ारला जाण्याची शक्यता आहे. उपअभियंत्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली होती. ती भरून घेण्यात आली आहे. प्रश्न नेमके कोणते होते याचा खुलासा करण्यास मात्र समितीने नकार दिला.(प्रतिनिधी)