शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातर्फे दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 14, 2017 20:26 IST

महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आता भाजपाने पक्षशिस्तीचे कठोर पालन करण्याकडे लक्ष केंद्रित केले

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 14 - महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आता भाजपाने पक्षशिस्तीचे कठोर पालन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शहर महामंत्री विजय आसोले व दक्षिण मंडळ महामंत्री बंडू शिरसाट या दोन पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीनंतरची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

संबंधित दोन्ही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्या अशा तक्रारी होत्या. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, संबंधितांनी स्पष्टीकरण सादर केले नाही. त्यामुळे दोघांनाही सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका निवडणूक काळात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. प्रत्यक्ष निवडणूक न लढणाऱ्यांचा यात समावेश नव्हता. मात्र, आता निवडणुकीनंतर बंडखोरांना साथ देणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.भाजपला महापालिकेत एकतर्फी यश मिळाले. संख्याबळ वाढले. मात्र, या उत्साहात प्रत्येकाला पक्षशिस्तीचे भान असावे, तसेच पक्षविरोधी भूमिका घेतली तर माफी नाही, असा संदेश कार्यकर्त्यांना देण्यासाठी संबंधित कारवाई करण्यात आली आहे. आणखी काहींवर कारवाई- भाजपाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रभागातील विजयी व पराभूत उमेदवार संबंधितांविरोधात असलेले पुरावे पक्षाकडे जमा करीत आहेत. हे पुरावे गोळा झाल्यानंतर आणखी काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.