शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विनामास्क ३३ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : काेराेनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रतिबंधात्मक उपाय ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : काेराेनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नगर पंचायतीच्या पथकाने साेमवारी (दि. २२) शहरात विनामास्क फिरणाऱ्या ३३ जणांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून ६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी तालुक्यात काेराेना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनात नगर पंचायत पथकाने शहरात माेहीम राबविली. यात अनावश्यक गर्दी, फिजिकल डिस्टन्सिंग‌ व मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पथकाने राष्ट्रीय मार्गावर ट्रॅव्हल्सची तपासणी केली तसेच विनामास्क फिरणाऱ्या ३३ जणांवर प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे दंड ठाेठावला. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका सभागृहावर दंडात्मक कारवाई करून दाेन हजाराचा दंड वसूल केला. या पथकात नगर पंचायत कर्मचारी परसराम वावरे, अशोक लांजेवार, राजू महाजन, सुनील कलसे, भगवान वाघमारे, रोशन गजभिये, संजय मेश्राम आदींचा समावेश होता.

....

नियमाचे उल्लंघन, सभागृहावर कारवाई

शहरातील एका सभागृहात साेमवारी लग्नकार्य होते. सभागृहात गर्दी कमी असली, तरी उपस्थितांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याचे चित्र हाेते. ही बाब नगर पंचायत पथकाच्या निदर्शनास येताच, मंगला कार्यालयावर नियमाचे उल्लंघन केल्यावरून २ हजार रुपयाचा दंड ठोठावला. मंगल कार्यालयांवर कारवाई होत असल्याने अनेकांनी शहरात आयोजित लग्नकार्य रद्द करून मूळ गावी लग्न उरकण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. साेमवारी शहरातील सभागृहात आयाेजित २-३ लग्न ऐनवेळी गावखेड्यात उरकण्यात आले, हे विशेष.

...

एकच ग्लास, चार जणांचा वापर

काेराेनाचा संसर्ग वाढत असतानाच सर्वाधिक धाेका शहरातील देशी दारू दुकानात आहे. येथे एकच ग्लास चक्क ४ ते ५ व्यक्ती वापरतात. त्यानंतर ताेच मद्याचा ग्लास पुढे अनेकांच्या तोंडाला लागत आहे. या ठिकाणी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दारूच्या दुकानातील गर्दीवर आळा काेण घालणार, हा प्रश्नच आहे.