शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा खून करणाऱ्या आरोपीची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मित्राचा खून करणाऱ्या आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. हे प्रकरण ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मित्राचा खून करणाऱ्या आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. हे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी निर्णय दिला.

मंगेश सारंगधर कुंभारे (३८) असे आरोपीचे नाव असून तो सुमठाणा, ता. भद्रावती येथील रहिवासी आहे. मृताचे नाव विजय इंगळे होते. हे दोघेही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कार्यरत होते, तसेच एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते; परंतु घटनेच्या चार महिन्यांपूर्वी त्यांचे खटकले. त्यातून १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कुंभारेने इंगळेचा चाकूने वार करून खून केला.

७ नोव्हेंबर २०१७ रोजी वरोरा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. हा खून रागाच्या भरात झाला. त्यामुळे शिक्षा कमी करण्यात यावी, अशी विनंती त्याने केली होती. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून लावले. भांडण झाल्यानंतर इंगळे पळून गेला होता; परंतु कुंभारेने पाठलाग करून त्याला पकडले व तो मरेपर्यंत चाकूने वार केले, असे अपील फेटाळताना नमूद करण्यात आले.