शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

डीजेवाल्याला मारहाण केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:20 IST

मारबत बडग्याच्या मिरवणुकीत वाजणारा डीजे पाचपावली पोलिसांनी जप्त केला. डीजे मालक आणि सोबतच्या तरुणाला ठाण्यात आणले.

ठळक मुद्देमारबत बडग्याच्या मिरवणुकीत वाजणारा डीजे पाचपावली पोलिसांनी जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मारबत बडग्याच्या मिरवणुकीत वाजणारा डीजे पाचपावली पोलिसांनी जप्त केला. डीजे मालक आणि सोबतच्या तरुणाला ठाण्यात आणले. त्यानंतर एका तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे तो बेशुद्ध पडल्याचा आरोप डीजे समर्थक तसेच मिरवणुकीतील तरुणांनी केला असून पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाचपावली पोलिसांनी मात्र कारवाईमुळे डीजेवाले तथ्यहीन आरोप करीत असल्याचा प्रत्यारोप करून मारहाणीचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.नागपूर शहराचे वैभव मानले जाणारी मारबत बडग्याची मिरवणूक सकाळपासून शहरातील विविध भागातून निघाली. मिरवणुकीत डीजे वाजविला जात होता. पोलिसांनी डीजेला मनाई केल्याने अजनीतील रामेश्वरीसह ठिकठिकाणी मिरवणुकीचे आयोजक आणि पोलिसांमध्ये वाद झाले. तणावही निर्माण झाला. दुपारी ४ च्या सुमारास अशाच प्रकारे एक मिरवणूक पाचपावली ठाण्यासमोरून जात होती.डीजेही वाजत होता. पाचपावली पोलिसांनी डीजे वाजविण्यास मनाई केली. त्याला दाद मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी डीजे तसेच ते वाजविणाºया चार ते पाच जणांना पोलीस ठाण्यात आणले. तेथे बाचाबाचीही झाली अन् तणाव निर्माण झाला. अचानक शिवनंद अनिल वाघमारे हा तरुण बेशुद्ध पडला.पोलिसांनी त्याला मारहाण केल्यामुळेच तो बेशुद्ध पडल्याने तणाव वाढला. त्याला त्याच्या सहकाºयांनी लगेच मेयोत नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याचवेळी अनिल नामक पोलीस उपनिरीक्षकांनी मेयोत शिवीगाळ करून एकाचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप डीजेवाल्यांनी केला. ते कळताच विदर्भ बॅकस्टेज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बारस्कर आणि डीजे असोसिएशनचे पदाधिकारी मेयोत पोहचले.त्यांनी मारहाण करून शिवीगाळ करणाºया पाचपावली पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी कारवाई करावी, मारहाण करण्याचा त्यांना अधिकार कुणी दिला, अशीही विचारणा केली. या घटनेमुळे रात्रीपर्यंत मेयोत तणाव होता.तरुण बेशुद्ध : पोलिसांनी केला मारहाणीचा इन्कारआम्ही त्याला बोटही लावले नाहीया संबंधाने पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मारहाण आणि शिवीगाळीचा इन्कार केला. फीट आल्यामुळे वाघमारे खाली पडल्याचे सांगून पोलिसांनी कांदा सुंगविल्यानंतर तो शुद्धीवर आला. नंतर त्याच्या मित्रांनी त्याला उचलून नेले, असे हिवरे म्हणाले. पोलीस ठाण्याच्या आवारात सीसीटीव्ही आहे. त्यामुळे मारहाणीच्या आरोपात तथ्य नाही. आम्ही त्याला मारहाण तर सोडा बोटही लावले नाही, असेही ते म्हणाले.