---
चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
नागपूर - वसंतनगर जुना बाबुळखेडा भागात राहणाऱ्या कीर्ती प्रदीप मोहिते (वय ४६) यांचा बुधवारी सायंकाळी आकस्मिक मृत्यू झाला.
घरी त्या पाणी भरत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे खाली कोसळल्या. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.