शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचालकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवणी : भरधाव अज्ञात वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात डाेक्याला गंभीर दुखापत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवणी : भरधाव अज्ञात वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारशिवणी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-पारशिवणी मार्गावरील परसाेडी फाटा येथे साेमवारी (दि. २९) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

रवी शिवाजी गोडघाटे (वय ५८, रा. राजकमल चौक, पार्वतीनगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. ते फाेटाेग्राफीचा व्यवसाय करायचे. पारशिवणी येथील नातेवाइकाने हाेळीनिमित्त निमंत्रण दिल्याने ते एमएच-४९/पी-३०५४ क्रमांकाच्या माेटारसायकलने खापरखेडा (ता. सावनेर) मार्गे पारशिवणीला येत हाेते. दरम्यान, ते या मार्गावरील परसाेडी फाटा परिसरात असलेल्या शेगावकर यांच्या शेताजवळ येताच विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली आणि वाहन निघून गेले. यात ते शेताच्या रस्त्यालगत असलेल्या कुंपणावर फेकले गेले. शिवाय, त्यांच्या डाेक्यालाही गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. या प्रकरणी पारशिवणी पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, हा अपघात नसून घातपात असावा, अशी शक्यताही त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.