शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडमध्ये ‘मिशन ॲडमिशन’ला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST

उमरेड : कोरोनाच्या लाटेतच इयत्ता दहावीचा निकाल लागला. आता हेच विद्यार्थी शिक्षणाच्या पुढील प्रवासासाठी धावपळ करीत आहेत. तालुक्यातील विविध ...

उमरेड : कोरोनाच्या लाटेतच इयत्ता दहावीचा निकाल लागला. आता हेच विद्यार्थी शिक्षणाच्या पुढील प्रवासासाठी धावपळ करीत आहेत. तालुक्यातील विविध महाविद्यालयात ‘मिशन ॲडमिशन’साठी रांग लागत असून, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मनपसंत शाखेत प्रवेश मिळत आहे. दुसरीकडे काही विद्यार्थ्यांचा हिरमोड होत असून, टक्केवारी कमी पडल्याने पर्यायाची निवड करावी लागत आहे. काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची पहिली यादी झळकली असून, अन्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.

उमरेड तालुक्यात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २,०४२ आहे. तालुक्यात कनिष्ठ विद्यालय तथा महाविद्यालयांची संख्या दहा आहे. शिवाय पॉलटेक्निक कॉलेज, आयटीआय येथेही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. उमरेड शहरासह तालुक्यातील सिर्सी, ब्राह्मणी, बेला, चांपा येथेसुद्धा प्रवेश प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र आहे. प्रवेश प्रक्रिया वेगाने होत असली तरी शाळा-महाविद्यालये सुरू होणार कधी, असा सवाल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा आहे.

-

जादा प्रवेश नको

निर्धारित प्रवेश क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवेश देऊ नका, असा आदेश नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी दिले आहेत. जादाचे प्रवेश दिल्याने त्याचा विपरीत परिणाम अन्य महाविद्यालयांच्या प्रवेशावर होतो. तुकडी कमी होणे, शिक्षक अतिरिक्त होणे, असाही परिणाम होत असल्याचे या पत्रात नमूद आहे.

-

शाळा सुरू करा

ग्रामीण भागातील वर्ग आठवी ते बारावीच्या बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शहरातील शाळांना अद्याप हिरवी झेंडी मिळाली नाही. ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी विचलित झाले आहेत. दुसरीकडे पालकसुद्धा शाळांच्या फी वसुली धोरणामुळे कमालीचे वैतागले आहेत. एकीकडे विविध कार्यक्रम, उपक्रम नियमावलींना केराची टोपली दाखवीत राजरोसपणे सुरू आहे. दुसरीकडे शाळांवरच गंडांतर आणल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेकडोंच्या उपस्थितीत राजकीय कार्यक्रम थाटात साजरे केले जात असताना, दुसरीकडे शाळांच्या बाबतीत अद्याप कोणताही निर्णय होत नसल्याने आश्चर्य आणि संतापसुद्धा व्यक्त होत आहे. शाळा सुरू करा, अशी पालकांची मागणी आहे.