शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहात मंत्री नसल्याने कामकाज तहकूब

By admin | Updated: December 15, 2015 05:02 IST

विरोधी पक्षातर्फे नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना सभागृहात

नागपूर : विरोधी पक्षातर्फे नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना सभागृहात महसूल, कृषी, मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे मंत्री वा राज्यमंत्री उपस्थित नव्हते. यावर संतप्त विरोधी सदस्यांनी सरकारविरोधात घोषणा देत गोंधळ घातला. गोंधळामुळे तालिका सभापती नरेंद्र पाटील यांनी विधान परिषदेचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब केले.शेकापचे जयंत पाटील यांनी सभागृहात महसूल, कृषी, मदतकार्य व पुनर्वसन खात्याचे मंत्री वा राज्यमंत्री उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांच्यासह विरोधी सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. थोड्याच वेळात परिवहन मंत्री दिवाकर रावते व संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट सभागृहात आले. त्यांनी महसूल मंत्री विधानसभेत उत्तर देत असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर गोंधळ शमला व पुन्हा चर्चेला सुरुवात झाली.(प्रतिनिधी)सरकार कमी पडणार नाहीराज्यातील २२ जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे ५० लाख शेतकरी संकटात आहेत. सरकारने शेतकऱ्यांना ८,५०० कोटींची मदत केली आहे. दुष्काळग्रस्तांता मदत करताना सरकार कुठे कमी पडणार नाही, अशी ग्वाही सदस्य पांडुरंग फुंडकर यांनी प्रस्तावावर बोलताना दिली. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. परंतु कें द्र सरकारने केलेल्या ७० हजार कोटींच्या कर्जमाफीत राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ सात हजार कोटींचे कर्ज माफ झाले. याचा लाभ प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रालाच झाला. शेतीसाठी पाणी, बाजारपेठ व मालाचे मार्केटिंग होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.