शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ने सुरू केली भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन

By admin | Updated: July 23, 2015 03:07 IST

सरकारी-निमसरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना कामकाजासाठी विनाकारण त्रास देण्यात येतो.

पंकज गुप्ता यांच्या हस्ते शुभारंभ : नागरिकांच्या तक्रारी सोडविणारनागपूर : सरकारी-निमसरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना कामकाजासाठी विनाकारण त्रास देण्यात येतो. यापुढे सरकारी कार्यालयातून नागरिकांची कामे वेळेत होत नसतील तर थेट आम आदमी पार्टी नागपूर शहरतर्फे सुरू करण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनवर तक्रार करावी, असे आवाहन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी नागरिकांना केले. आम आदमी पार्टीच्या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनचा शुभारंभ बुधवारी त्यांच्या हस्ते झाला. या हेल्पलाईनचा क्रमांक ९४४५०७७२२२ हा आहे. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पंकज गुप्ता म्हणाले की, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती जनतेचे काम करण्यासाठी झाली आहे. मात्र हे कर्मचारी पैशाशिवाय जनतेचे कुठलेही काम करीत नाही. सरकारी कार्यालयात जनतेचे कुठलीही कामे वेळेत करून मिळत नाही. कार्यालयातील कर्मचारी त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्रास देतात. छोट्या छोट्या कामासाठी उद्या या, नंतर या असे सांगून त्रास देतात. त्यामुळे त्रस्त होऊन नागरिक दलालांकडे जातो. दलाल नागरिकांकडून पैसे घेऊन तत्काळ काम करवून देतात. हा प्रकार प्रत्येक सरकारी कार्यालयात सर्रास होत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आपने ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर नागरिकांनी तक्रार केल्यास आपचे कार्यकर्ता थेट सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणार आहे. यासाठी नागरिकांचा सहयोग अपेक्षित आहे. या प्रकारामुळे सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारावर अंकुश राहणार आहे. पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे विदर्भ समन्वयक देवेंद्र वानखेडे, सचिव जगजितसिंग, नागपूर समन्वयक अशोक मिश्रा, सचिव कविता सिंगल उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेतकरी विकासासाठी स्वामीनाथन आयोग लागू कराआम आदमी पार्टीच्यावतीने विदर्भात शेतकरी-शेतमजूर संवाद यात्रा काढून, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला लागत मूल्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने, महत्त्वाचे कारण पुढे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी आपतर्फे करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आप आर्थिक मदत करणार आहे. मनपा निवडणूक लढण्याचा अद्यापही विचार नाहीआम आदमी पार्टी संघटना मजबूत करण्यासाठी बूथ लेव्हलवर क्रियाशील आहे. शहरात कार्यकर्ता जोडण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या १८१० बूथपैकी आपचे १००० बूथ झाले आहेत. आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची आहे. जनता जोपर्यंत आमच्यासोबत येणार नाही तोपर्यंत निवडणूक लढविण्याचा आपचा विचार नसल्याचे पंकज गुप्ता म्हणाले.