शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

९७ जनावरांची केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:09 IST

नरखेड : पाेलिसांनी वडचिचाेली-सावरगाव मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक पकडले. यात ट्रकचालकासह आठ आराेपींना अटक ...

नरखेड : पाेलिसांनी वडचिचाेली-सावरगाव मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे चार ट्रक पकडले. यात ट्रकचालकासह आठ आराेपींना अटक करण्यात आली असून, ट्रकमधील ७८ रेडे व १९ म्हशी अशा ९७ जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत एकूण एक काेटी दोन लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ६) मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये राेशन नानुवरकडे (३५, रा. चंडालभाटा, जबलपूर, मध्य प्रदेश), आमीर महबूब कुरेशी (२०, रा. भैसवाहिता, नयनपूर, जि. मंडला), अन्सार रियासत अली (३५, रा. डिलवारा, ता. नयनपूर, जि. मंडला), आसिफ अहमद आसीम अहमद (१९, रा. भैसवाहीता, नयनपूर, जि. मंडला), पवनकुमार सुरेश नारायण पाठक (३४, रा. लालिता, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश), माेहम्मद शेबुमाेहम्मद नसीम (१८, रा. साेनवरसाता, जि. प्रतापगड), जाहीद अली असीफअली (१८, रा. वाजीदपूर, ता. काेहंडळ, जि. प्रतापगड) व ट्रक क्लिनर अब्दुल कादीर आजमअली (१८, रा. नरसिंहगड, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातून वडचिचाेली-सावरगावमार्गे अवैधरीत्या गुरांची कत्तलखान्याकडे वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी सावरगाव बसथांबा परिसरात नाकाबंदी सुरू केली. दरम्यान, मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास पाेलिसांनी सीजी-०९/एम-५६४३, सीजी-०९/जेबी-७२०१, यूपी-७२/एटी-९४९४ व यूपी-७२/एटी-३५२६ क्रमांकाचे चार ट्रक थांबवून पाहणी केली असता, त्यात १९ म्हशी व ७८ हेले (रेडे) आढळून आले. ही जनावरांची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी सर्व जनावरे व चार ट्रक ताब्यात घेत आराेपींना अटक केली. हेले व म्हशींना नरखेड येथील अमृत गाेरक्षण केंद्रात पाठविण्यात आले. या कारवाईत ९७ जनावरे व चार ट्रक असा एकूण एक काेटी दोन लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली.

याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी आराेपींविरुद्ध कलम ११ (१)(ड) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायदा, सहकलम ८३,१७७ अन्वये गुन्हा नाेंदवून आठ आराेपींना अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार जयपालसिंग गिरासे, पाेलीस उपनिरीक्षक अरुण खुटेमाटे, महेश बाेथले, सहायक फाैजदार लक्ष्मीकांत बांदरे, हवालदार सुरेंद्रसिंह ठाकूर यांच्या पथकाने केली.