शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ८००० किलो गुटखा जप्त

By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST

राज्य शासनाने बंदी लावली असताना उपराजधानीत अनेक ठिकाणी सर्रास गुटखाविक्री सुरू असल्याचे दिसून येते. वर्षभराच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यातून सुमारे ८ हजार किलो गुटखा जप्त

अन्नपदार्थ भेसळीची ९७ प्रकरणे : ८९ व्यापारी प्रतिष्ठानांवर धाडीनागपूर : राज्य शासनाने बंदी लावली असताना उपराजधानीत अनेक ठिकाणी सर्रास गुटखाविक्री सुरू असल्याचे दिसून येते. वर्षभराच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यातून सुमारे ८ हजार किलो गुटखा जप्त करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती दिली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाला विचारणा केली होती. १ एप्रिल २०१३ ते ३० जून २०१४ या कालावधीत भेसळीची किती प्रकरणे समोर आली, किती धाडी टाकण्यात आला व यात सर्वात जास्त कशाचा साठा जप्त झाला इत्यादी संदर्भात त्यांनी माहिती मागितली होती. या कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने ८९ व्यापारी प्रतिष्ठानांवर धाडी टाकल्या. यात ७, ९४५ किलो गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत ३१ लाख ८९ हजार २७२ रुपये इतकी आहे. गुटख्यावर बंदी लावणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. परंतु चोरट्या मार्गाने गुटखाविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरनिराळे प्रयत्न करण्यात येतात. मात्र शेजारच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात हा गोरखधंदा सुरू आहे. भेसळीची ९७ प्रकरणेया कालावधीत नागपूर जिल्ह्यात अन्न पदार्थांमध्ये भेसळीची सुमारे ९७ प्रकरणे उघडकीस आली. यातील ६१ प्रकरणांमध्ये दुय्यम दर्जाचे खाद्यपदार्थ आढळून आले तर २६ प्रकरणांत पदार्थ हे प्रकृतीसाठी असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. ३, ६६१ किलो वजनाचा नाशवंत माल (खोवा व आंबा) नष्ट करण्यात आला. भेसळीसंदर्भात १९ व्यापाऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत तर २१ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. या कालावधीत १८ लाख ६१ हजार ४६१ रुपये किमतीचा १३,७२४ किलोंचा साठा जप्त करण्यात आला.(प्रतिनिधी)