शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

११ पैकी ८ आरोपींना अटक

By admin | Updated: December 31, 2014 01:06 IST

बिबट कातडेप्रकरणात वन विभागाच्या पथकाने आजवर एकूण ११ पैकी ८ आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे यास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या

बिबट कातडेप्रकरण : तिघांचा शोध सुरू, सौद्यात स्थानिकांनी केली गुंतवणूक भिवापूर : बिबट कातडेप्रकरणात वन विभागाच्या पथकाने आजवर एकूण ११ पैकी ८ आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे यास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली असल्याचे उमरेड (दक्षिण)चे वन परिक्षेत्र अधिकारी एन. सी. गोसावी यांनी सांगितले. बिबट कातडे खरेदीत काही स्थानिकांनी गुंतवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. रणजितसिंग ज्युनी रा. कच्च्छेपार, जिल्हा चंद्रपूर याला घटनेच्या दिवशी तर सरबजीत सिंग रा. पवनवार जिल्हा चंद्रपूर, श्रावण वाघमारे रा. भिवापूर व शंकर गायकवाड रा. तास, ता. भिवापूर या तिघांना काही दिवसांनी अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावणने दिलेल्या माहितीच्या आधारे शनिवारी संजय फत्तू बागडे रा. भिवापूर, मंगेश लिंगायत व महादेव वाणी दोघेही रा. भुयार, जिल्हा भंडारा आणि किशोर वाणी रा. चांपा या चौघांना वन विभागाच्या पथकाले अटक केली. वन विभागाच्या नागपूर येथील विशेष पथकाने १२ सप्टेंबरला स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात रणजितसिंग ज्युनी याला बिबट्याच्या कातड्यासह अटक केली होती. त्त्यावेळी अन्य आरोपी पसार झाले होते. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी याच परिसरातील अभय विश्वेकर यांच्या शेतात पुन्हा बिबटाचे कातडे आढळूल आले. दरम्यान, रणजितसिंगकडून श्रावण वाघमारे याचे नाव पुढे आल्याने त्याला ९ डिसेंबरच्या दुपारी चंद्रपूर जिल्ह्यातील साठगाव शिवारातील कुंडलिक मोईनकर यांच्या शेतात सापळा रचून अटक केली. त्यावेळी श्रावणचा साथीदार प्रशांत जांभूळकर हा पळून गेला होता. सदर दोन्ही कातडे पवनपार येथील सरबजितसिंगकडून आणल्याची माहिती श्रावणने देताच ९ डिसेंबरच्या मध्यरात्री सरबजितला चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार येथून अटक केली. ही शिकार आपल्या वडिलाने केल्याची माहिती सरबजितसिंगने वन अधिकाऱ्यांना दिली. त्याचे वडील व्यसनी असल्याने ही शिकार सरबजितनेच केली असावी अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. रणजितसिंग व सरबजितसिंह हे दोघे चुलते-पुतणे होत. ही कारवाई वन्यजीवचे वन परिक्षेत्र अधिकारी जी. एफ. लुचे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. श्रावण वाघमारेला बोलते केल्यानंतर वन अधिकाऱ्यांना नवीन माहिती मिळाली. बिबट कातड्याच्या सौद्यात बाहेरील आरोपींसह तीन स्थानिक तरुणांनी रक्कम गुंतविली असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली आहे. या तिघांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी एन. सी. गोसावी यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)