शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

दहा महिन्यात ७७४ नवजात शिशूंचा मृत्यू

By admin | Updated: July 23, 2016 03:04 IST

बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे.

मेडिकलमध्ये सोयींअभावी वाढतेय शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण : रेफर केलेल्या बालकांसाठी ‘एनआयसीयू’च नाही सुमेध वाघमारे नागपूर बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. आरोग्यासाठी मोठा निधी देत आहे. ग्रामीण भागांत मृत्यूदर रोखण्यात शासनाला काही प्रमाणात यशही आले आहे, परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चित्र याच्या उलट आहे. जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ या दहा महिन्यांच्या कालावधीत ७७४ नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे. या चिमुकल्यांचा कोंडणाऱ्या श्वासामागे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आणि अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेरून येणाऱ्या नवजात शिशूंसाठी नसलेले अतिदक्षता नवजात शिशू कक्ष (एनआयसीयू) हे कारण ठरत आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेकडे ‘एनआयसीयू’ कक्ष नाही. आरोग्य विभागाचे डागा रुग्णालयात ४३ खाटांचा विशेष नवजात शिशू कक्ष आहे. परंतु येथे ‘न्युओलेटर व्हेंटिलेटर’ व ‘टर्शिअरी केअर’ची सोय नसल्याच्या कारणांवरून अशा रुग्णाना मेडिकलमध्ये पाठविले जाते. परिणामी, विदर्भासह, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी रुग्णांचा भार एकट्या मेडिकलवर पडत आहे.मेडिकलच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागांतर्गत वॉर्ड क्र. ३,५,६ व २० खाटांचे एनआयसीयु आहे. एकट्या मेडिकलमध्ये दिवसाकाठी ३०वर मुले जन्माला येतात. यातील कमी वजन व कमी दिवस किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या नवजात शिशूंना ‘एनआयसीयुमध्ये भरती केल्या जाते. येथे आवश्यक यंत्रसामुग्रीसोबतच चार न्युओलेटर व्हेंटिलेटरची सोय आहे. परंतु मेयो किंवा इतर खासगी रुग्णालयातून कितीही गंभीर अवस्थेत नवजात शिशू आल्यास त्याला या कक्षामध्ये ठेवले जात नाही. त्याच्यावर सामान्य वॉर्डात उपचार केले जातात. १०० खाटांचे असावे एनआयसीयू मेडिकलवर वाढत्या रुग्णांचा भार लक्षात घेऊन आरोग्य विभागाने डागातील विशेष नवजात शिशु कक्षात आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. बाहेरून आलेले शिशु मेडिकलच्या ‘एनआयसीयू’मध्ये ठेवण्यासाठी शासनाने १०० खाटांची सोय करावी, असेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे. १० न्युओलेटर व्हेंटिलेटरची गरज मेडिकलच्या ‘एनआयसीयू’मध्ये मेडिकलमध्येच जन्माला आलेली नवजात बालके ठेवली जात असली तरी त्यांच्यासाठीही येथील खाटा कमी पडतात. अनेकवेळा एका खाटेवर दोन बालकांंवर उपचार केला जातो. याशिवाय अल्प उपकरणांमुळेही चिमुकल्यांच्या जीवावर बेतते. १० ‘न्युओलेटर व्हेंटिलेटर’ची गरज असताना येथे केवळ चारच आहेत. इतरही आवश्यक उपकरणांची संख्या कमी असून काही नादुरुस्त स्थितीत आहे.