शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १० दिवसात ५७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 10:38 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यात मे महिन्यात म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे ठाकले होते.

ठळक मुद्दे १०२ रुग्णांवर शस्त्रक्रिया

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असताना आता म्युकरमायकोसिसची चिंताही कमी होताना दिसून येत आहे. २० ते ३० जून यादरम्यान ९३ रुग्ण व १६ मृत्यूची नोंद झाली असताना मागील दहा दिवसात ५७ रुग्ण व ९ मृत्यू झाले. रविवारी शासकीय रुग्णालयात नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र, खासगी रुग्णालयात दोन नवे रुग्ण आढळून आले. मागील दोन दिवसांपासून एकाही रुग्णाचा मृत्यू नाही.

नागपूर जिल्ह्यात मे महिन्यात म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे ठाकले होते. या महिन्यात रोज १० ते १५ नव्या रुग्णांची भर पडत होती. परंतु आता ही संख्या दोन ते तीनवर आली आहे. २० जून रोजी रुग्णांची संख्या १५१५, मृतांची संख्या १३८, एकूण शस्त्रक्रिया १११०, तर रुग्णालयातून ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. ३० जूनपर्यंत रुग्णांची एकूण संख्या १६०८ झाली. दहा दिवसांत ९३ नव्या रुग्णांची भर पडली. १६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १५४ वर पोहोचली. १ ते ११ जुलै या १० दिवसात ५७ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या १६६५ झाली. ९ रुग्णांचे जीव गेल्याने मृतांची संख्या वाढून १६३ वर पोहोचली. या कालावधीत १०२ शस्त्रक्रिया झाल्याने ही १२९७ झाली, तर १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १३०७ वर गेली. सध्या शासकीय रुग्णालयात ११४, तर खासगी रुग्णालयात ८१ असे एकूण १९५ रुग्ण उपचार घेत आहेत.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिस