शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसचे १० दिवसात ५७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असताना आता म्युकरमायकोसिसची चिंताही कमी होताना दिसून येत आहे. २० ते ३० ...

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असताना आता म्युकरमायकोसिसची चिंताही कमी होताना दिसून येत आहे. २० ते ३० जून यादरम्यान ९३ रुग्ण व १६ मृत्यूची नोंद झाली असताना मागील दहा दिवसात ५७ रुग्ण व ९ मृत्यू झाले. रविवारी शासकीय रुग्णालयात नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र, खासगी रुग्णालयात दोन नवे रुग्ण आढळून आले. मागील दोन दिवसांपासून एकाही रुग्णाचा मृत्यू नाही.

नागपूर जिल्ह्यात मे महिन्यात म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे ठाकले होते. या महिन्यात रोज १० ते १५ नव्या रुग्णांची भर पडत होती. परंतु आता ही संख्या दोन ते तीनवर आली आहे. २० जून रोजी रुग्णांची संख्या १५१५, मृतांची संख्या १३८, एकूण शस्त्रक्रिया १११०, तर रुग्णालयातून ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. ३० जूनपर्यंत रुग्णांची एकूण संख्या १६०८ झाली. दहा दिवसांत ९३ नव्या रुग्णांची भर पडली. १६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १५४ वर पोहोचली. १ ते ११ जुलै या १० दिवसात ५७ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या १६६५ झाली. ९ रुग्णांचे जीव गेल्याने मृतांची संख्या वाढून १६३ वर पोहोचली. या कालावधीत १०२ शस्त्रक्रिया झाल्याने ही १२९७ झाली, तर १८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १३०७ वर गेली. सध्या शासकीय रुग्णालयात ११४, तर खासगी रुग्णालयात ८१ असे एकूण १९५ रुग्ण उपचार घेत आहेत.

तारीख : रुग्ण : मृत्यू

५ जुलै : ०६ : ००

६ जुलै :१० :००

७ जुलै : ०५ : ००

८ जुलै : ०७ : ०३

९ जुलै : ०३ : ०२

१० जुलै : ०२ : ००

११ जुलै : ०२ : ००

- म्युकरमायकोसिस

: एकूण रुग्ण : १६६५

: एकूण मृत्यू : १६३

: एकूण शस्त्रक्रिया : १२९७

: रुग्ण डिस्चार्ज : १३०७

: सध्या उपचाराखाली : १९५