शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

सात वर्षांत ५० वाघांचा मृत्यू!

By admin | Updated: July 29, 2015 02:50 IST

जाणकारांच्या मते, सध्या जगातील भारतासह केवळ ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया याच देशातील जंगलात वाघाचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे.

वाघांच्या संवर्धनासाठी आज ‘ग्लोबल टायगर डे’ साजरा करणारजाणकारांच्या मते, सध्या जगातील भारतासह केवळ ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया याच देशातील जंगलात वाघाचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. इतर सर्व देशातील वाघ प्राणिसंग्रहालयात पोहोचले आहेत. जंगली वाघांपैकी ५० टक्के वाघ भारतात आहे. मात्र असे असले, तरी भारतातील वाघसुद्धा आज दुर्मिळ होत चालला आहे. वन विभागाच्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये सर्वांधिक म्हणजे, १३ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सात वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून, तीन वाघांचा अपघाती व तीन वाघांच्या शिकारी झाल्या आहेत. अशाप्रकारे मागील सात वर्षांत एकूण ३० वाघांचा नैसर्गिक, ११ वाघांचा अपघाती व ९ वाघांच्या शिकारी झाल्या आहेत. यावर्षी २३ एप्रिल ते २९ जूनदरम्यान एकाच चंद्रपूर जिल्ह्यात चार वाघांचा मृत्यू झाला. शिवाय एका वाघाचा जळगाव जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. सहा महिन्यात पाच वाघांच्या या मृत्यूने अक्षरश: वन विभाग हादरला आहे. यात वाघाच्या मृत्यूची पहिली घटना १ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील दौलाखेडा येथील कम्पार्टमेंट क्र. ५७२ मध्ये उघडकीस आली. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा डिव्हिजनमध्ये २३ एप्रिल रोजी जुनोना रेंजमधील कम्पार्टमेंट क्र. ४७६ मध्ये दुसरी घटना, ब्रम्हपुरी डिव्हिजनमधील तळोधी रेंजमध्ये तिसरी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरात चौथी व सिंदेवाही रेंजमधील काघाटा येथील कम्पार्टमेंट क्र. १६८ मध्ये पाचवी घटना उघडकीस आली. या घटना रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत आहे. वाघाप्रमाणेच बिबट हासुद्धा जंगलातील महत्त्वाचा प्राणी समजल्या जातो. परंतु अलीकडे बिबटसुद्धा नामशेष होऊ लागला आहे. मागील सहा वर्षांत राज्यातील ३२४ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात २००९ मध्ये ४८, २०१० मध्ये ५७, २०११ मध्ये ७०, २०१२ मध्ये ६८, २०१३ मध्ये ४३ व २०१४ मध्ये ३८ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज वाघासोबतच बिबट्यांनाही वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.वाघाला तस्करांचा धोका साधारण २० व्या शतकाच्या सुरुवातीला देशात एक लाखांपेक्षा अधिक वाघांचा अधिवास होता. परंतु इंग्रज देश सोडून जाताना ती संख्या ४० हजारांपर्यंत खाली आली. दरम्यान हौस म्हणून वाघाची शिकार केली जात होती. ब्रिटिश देश सोडून गेल्यावरही देशात तोच प्रघात कायम होता. वाघांची ती चिंताजनक परिस्थिती पाहून काही वन्यजीव रक्षकांनी अशा हौशी शिकारीविरुद्ध आवाज उठविला होता. तसेच ‘टायगर प्रोजेक्ट’ हा वन्यजीव संवर्धन कार्यक्रमातील सर्वांत यशस्वी टप्पा मानल्या जातो. या माध्यमातून अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले, तसेच अनेक राष्ट्रीय उद्यानांची घोषणा करण्यात आली. या व्याघ्र प्रकल्पानंतर सामान्य नागरिकांचा वन्यजीवांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. लोकांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ निर्माण होऊ लागली. परिणामत: १९९० मध्ये देशातील वाघांची संख्या साडे चार ते पाच हजारांपर्यंत पोहोचली. परंतु याचवेळी आंतरराष्ट्रीय तस्कारांचे पुन्हा वाघांकडे लक्ष वेळले. यातून शिकारींचे प्रमाण वाढले आणि २००८ पर्यंत देशात केवळ १३०० वाघ शिल्लक राहिले.