शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वासनकरविरुद्ध ५० हजार पानी आरोपपत्र

By admin | Updated: July 17, 2015 02:53 IST

शिवाजीनगर येथे वासनकर वेल्थ मॅनेजमेंट या नावाने गुंतवणुकीचा गोरखधंदा उघडून आकर्षक व्याजाचे आमिष

अलीकडच्या इतिहासातील विक्रम : गुंतवणूकदारांची १६९ कोटींनी फसवणूकनागपूर : शिवाजीनगर येथे वासनकर वेल्थ मॅनेजमेंट या नावाने गुंतवणुकीचा गोरखधंदा उघडून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ४७८ गुंतवणूकदारांची १६९ कोटी रुपयांनी लुबाडणूक केल्याप्रकरणी बुधवारी एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात ३० हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. १ यापूर्वी दोन टप्प्यात १०-१० हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत एकूण ५० हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, अलीकडच्या नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील हा वेगळाच विक्रम आहे. २ वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर, भाऊ विनय जयदेव वासनकर, साळा अभिजित चौधरी, सासू कुमुद चौधरी, पत्नी भाग्यश्री प्रशांत वासनकर, भावसून मिथिला विनय वासनकर, व्यवस्थापक सारिका चंदेल ऊर्फ चारकुंडे आणि बिझनेस प्रमोटर सुजित मुझुमदार यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र आहे. आरोपींपैकी मिथिला, सारिका, कुमुद चौधरी आणि मुझुमदार हे आरोपपत्र दाखल करतेवेळी न्यायालयात हजर होते. ते सर्व जामिनावर आहेत. प्रशांत, विनय आणि भाग्यश्री, असे तिघे कारागृहात आहेत. ३या प्रकरणात आणखी बरेच आरोपी अटक होणे बाकी असून, त्यांच्या अटकेनंतर आणखी आरोपपत्र दाखल होणार आहेत. आर्थिक गुन्हे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे यांनी हे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. ४९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात प्रशांत वासनकरसह अन्य आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ४०९, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी ४७८ गुंतवणूकदारांची १६९ कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील कल्पना पांडे, पीडित गुंतवणूकदारांचे वकील अ‍ॅड. बी.एम. करडे, अ‍ॅड. भारत बोरीकर उपस्थित होते. भाग्यश्रीच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणीया प्रकरणातील सूत्रधारांपैकी एक भाग्यश्री प्रशांत वासनकर हिच्या जामीन अर्जावर उद्या शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भाग्यश्रीने वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा पैसा आपल्या खात्यात वळवून ५ कोटी ५८ लाख रुपये किमतीचे शेअर्स मुंबई येथील नरेश चंदन आणि चेतना चंदन यांच्यामार्फत खरेदी केले होते. हे शेअर्स १ लाख २४ हजार ८८ एवढे असून ते सिक्कीम फेरो अलॉईड या कंपनीचे आहेत. भाग्यश्रीने गुंतवणूकदारांना सदस्य बनवून १८ कोटी रुपये प्राप्त केले होते. याशिवाय तिने कंपनीचे २५ कोटी रुपये स्वत:च्या खात्यात वळते केले होते. ती परिधी ट्रेडिंगची संचालकही होती. परिधीच्या खात्यातील रोख आणि शेअर्सही तिने आपल्या खात्यात जमा केले होते. आपल्या खात्यातून तिने नरेश चंदन, अनिल सावरकर, विलास भोयर, सदोदय इन्व्हेस्टमेंट, रिना जैन, रत्नेश जैन, अविनाश भुते यांना मोठमोठ्या रकमा दिल्या होत्या, असे तपास पथकाला आढळून आले आहे.