शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

‘सीआयसीआर’ संचालकावर ५० हजाराचा खर्च

By admin | Updated: May 2, 2015 02:13 IST

केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या मुंबई खंडपीठाने सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च (सीआयसीआर) नागपूरचे संचालकावर...

नागपूर : केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या मुंबई खंडपीठाने सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च (सीआयसीआर) नागपूरचे संचालकावर अंतरिम आदेशाची अवमानना केल्यामुळे ५० हजार रुपयांचा खर्च बसविला आहे. ही रक्कम पीडित अर्जदाराला भरपाई म्हणून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नितीन झाडे असे अर्जदाराचे नाव आहे. ते सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च नागपूर येथे रिसर्च असोसिएटपदी कार्यरत होते. त्यांना पुढील आदेशापर्यंत पदावर कायम ठेवण्याचे अंतरिम आदेश लवादाने दिले होते. परंतु, संस्थेने लवादाची अनुमती न घेता ३० जून २०१२ पासून त्यांची सेवा संपुष्टात आणली. झाडे यांच्यासोबत इतर चौघांची सेवा संपुष्टात आणल्या गेली होती. इतरांना दुसऱ्या प्रकल्पात सामावून घेण्यात आले पण, झाडे यांना कुठेच नोकरी देण्यात आली नाही. ही बाब लक्षात घेता लवादाने संस्था संचालकावर ५० हजार रुपयांचा खर्च बसविण्यासोबतच झाडे यांना दुसऱ्या प्रकल्पात रिसर्च असोसिएटपदी नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. ५० हजार रुपये जमा करण्यासाठी येत्या ५ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्चने एप्रिल-२००६ मध्ये टेक्निकल असिस्टंट-२ व इतर दोन पदांकरिता जाहिरात काढली होती. त्यापूर्वी ७ वर्षांपासून रिसर्च असोसिएट पदावर कार्यरत असलेले झाडे यांनी टेक्निकल असिस्टंटपदासाठी अर्ज केला होता. त्यांची या पदावर तात्पुरती नियुक्तीही झाली होती. दरम्यान, दुसऱ्याला या पदावर सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लवादात अर्ज दाखल केला होता. २५ मार्च २००८ रोजी लवादाने याप्रकरणी जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगून झाडे यांना पुढील आदेशापर्यंत रिसर्च असोसिएटपदावर कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच, टेक्निकल असिस्टंटपदी दुसऱ्या उमेदवाराची नियुक्ती केल्यास ती प्रकरणाच्या निर्णयाधीन राहील असे स्पष्ट केले होते. संस्थेने या आदेशाचे उल्लंघन करून झाडे यांची सेवा संपुष्टात आणली होती. अर्जदारातर्फे अ‍ॅड. श्रीकांत देव यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)