शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

उपराजधानीच्या विकासासाठी ५० हजार कोटी

By admin | Updated: February 7, 2016 02:49 IST

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर २५ हजार कोटींची विकास कामे मंजूर करण्यात आली आहे.

गडकरींनी सांगितला पाच वर्षाचा अ‍ॅक्शन प्लॅन : इतवारी येथील मच्छीसाथ मार्केटचे भूमिपूजननागपूर : केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर २५ हजार कोटींची विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षात नागपूर शहरात ५० हजार कोटींची विकास कामे केली जातील, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली. इतवारी मच्छीसाथ मटन मार्केटच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, सुधीर पारवे, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे व महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या माध्यमातून नागपूर शहराचा सर्वांगीण विकास गतीने होत आहे. नागपुरातील नवीन विमानतळासाठी १५०० कोटी रुपयांची निविदा काढली जात आहे. ५० हजार लोकांना रोजगार उपराजधानीच्या विकासासाठी ५० हजार कोटी नागपूर : विविध प्रकल्पांच्या माध्यमातून ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. महापालिक ा निवडणुकीच्या वेळी मटन मार्केटचे आश्वासन दिले होते. ते आता पूर्ण होत आहे. यावर ८९ लक्ष रुपये खर्च केला जाणार आहे. नागरिकांची संमती असेल तर इतवारीमधील रस्त्याचे रुंदीकरण करू. राज्यातील इतर शहरात पाणीटंचाई आहे. परंतु नागपूर शहरात ही समस्या नाही. सहा महिन्यात या भागातील लोकांना २४ तास मिळेल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. शहरात लवकरच इथेनॉलवर ५० ग्रीन बसेस तर सीएनजीवर १२५ बसेस धावणार आहेत. शहरातील गरिबांसाठी ५० हजार घरे उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ४२५ चौरस फुटाची ही घरे ३.५० लाखांत उपलब्ध केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)नियोजन समितीने ६० कोटी द्यावेजिल्हा नियोजन समितीच्या ३०० कोटींच्या नियोजनात जेमतेम ३० कोटी देण्यात आले आहे. हा निधी वाढवून ५० ते ६० कोटी द्यावा, अशी मागणी महापौर प्रवीण दटके यांनी पालकमंत्र्यांकडे केली. एनआयटीच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्राला १०० कोटींचा विकास निधी मिळणार आहे. शनिवारी मंगळवारी बाजार येथील मच्छी मार्केट लोकार्पण, मोक्षधाम व गंगाबाई घाट येथील पुलांचे भूमिपूजन करण्यात आले. मटन व मच्छी मार्केटमुळे लोकांची सुविधा होईल, अशी माहिती दटके यांनी दिली. विकास कुंभारे म्हणाले, मेयो रु ग्णालयांसाठी २४ क ोटींचा निधी मंजूर आहे. ३१ मार्चपूर्वी तो खर्च न झाल्यास परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निधी परत जाणार नाही यासाठी शिर्षक बदलण्यात यावे. तसेच मध्य नागपुरातील तलावांचा विकास करण्यात यावा. रमेश सिंगारे यांनी प्रस्ताविकातून इतवारी मच्छीसाथ मटन मार्के ची माहिती दिली. यावेळी झोन सभापती रामदास गुडधे, परिवहन समितीचे सभापती सुधीर राऊ त यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी तर आभार नगरसेवक कल्पक भानारकर यांनी मानले. (प्रतिनिधी)