शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

४५८ कोटींसाठी सरकारकडे साकडे

By admin | Updated: August 18, 2015 03:31 IST

शहरातून नाग, पिवळी व पोहरा अशा तीन प्रमुख नद्या वाहतात. तसेच लहान नाल्यांची संख्या मोठी आहे. अतिवृष्टी व

नागपूर : शहरातून नाग, पिवळी व पोहरा अशा तीन प्रमुख नद्या वाहतात. तसेच लहान नाल्यांची संख्या मोठी आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नदी व नाल्याकाठावरील वस्त्या जलमय होतात. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याने नद्या व नाल्यांची दुरुस्ती तसेच संरक्षण भिंती उभारण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे ४५८ कोटीची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी दिली.१३ आॅगस्टला २०१३ सालची पुनरावृत्ती झाली. २४ तासात तब्बल १६४ मि.मी. पाऊ स झाल्याने शहरातील तलाव ओव्हर फ्लो झाले. नद्या व नाल्यांना पूर आल्याने नदीकाठावरील व सखल भागातील वस्त्या जलमय झाल्या होत्या. पुरात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीत लोकांना मदत करण्यासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली होती. अग्निशमन विभागाच्या बचाव पथकांच्या माध्यमातून समतानगर येथील ३५ व भरतवाडा येथील ४० लोकांना बाहेर काढण्यात आले. हुडकेश्वर येथील पोहरा नदीला पूर आल्याने नदीकाठावरील ४२ लोक ांना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. ५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होेते. विस्थापितांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.पालकमंत्र्यांनी शहरातील नुकसानीचा अहवाल मागितला होता. त्यानुसार मनपा प्रशासनाने केलेल्या सर्वेच्या प्राथमिक अंदाजानुसार नुकसान दर्शविण्यात आले आहे. आपत्ती ग्रस्तांना र्आिर्थक मदतीची गरज आहे. ती शासनाकडून लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)पुरामुळे ६० कोटींचे नुकसान४१३ आॅगस्टला नागपूर शहरात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे ४१६ कुटुंब विस्थापीत झाली. ४८६ लोकांना पुरातून वाचविण्यात आले. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. मालमत्ताचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार ५९.६२ कोटीचे नुकसान झाले आहे. या बाबतचा अहवाल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आल्याची माहिती दटके यांनी सोमवारी दिली.नुकसानग्रस्त वस्त्या४शहरातील समतानगर, कस्तुरबानगर, रिमानगर, गोदवारीनगर, झिंगाबाई टाकळी, भदन्त कौशल्यनगर, वेलेनगर, पाडुरंगनगर, काचीपुरा, सोनियानगर, वनदेवीनगर, संघर्षनगर, पांढराबोडी,भरतवाडा, हुडकेश्वर(पिपळा फाटा) गोरेवाडा, मानकापूर, गुलशननगर, विटभट्टी, अंबाझरी कॉलनी आदी वस्त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.