शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये स्फोटकांचे ४४० पॅकेट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:32 IST

रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून ३६ किलो वजनाचे १७,६०० रुपये किमतीचे स्फोटकांचे ४४० पॅकेट जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे.

ठळक मुद्दे आरपीएफची कारवाई : दानापूर-सिकंदराबादमध्ये दारूची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसमधून ३६ किलो वजनाचे १७,६०० रुपये किमतीचे स्फोटकांचे ४४० पॅकेट जप्त करून एका आरोपीस अटक केली आहे. तर बुधवारी दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून दारूच्या ५,४०० रुपये किमतीच्या १९ बाटल्या जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या चमूतील सदस्य विकास शर्मा, बिक्रम यादव, किशोर चौधरी हे मंगळवारी दुपारी १.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. त्यांना प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १६०९४ लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये दोन बॅग संशयास्पद स्थितीत ठेवलेल्या आढळल्या. या बॅगबाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तीने समाधानकारक उत्तर दिले नाही.आरपीएफने कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव अनिल माणिकचंद निगम (३८) रा. २५८, स्टेशन रोड, उन्नाव, उत्तर प्रदेश सांगितले. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यातील पॅकेटमध्ये स्फोटके असल्याचे लक्षात आले.उत्तर प्रदेशाच्या उन्नाव येथून कोल्हापूर येथील यात्रेत दुकानदारांच्या मागणीनुसार स्फोटके नेत असल्याचे त्याने सांगितले. यात्रेत स्फोटकांचे काय काम आहे, अशी विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यास अटक करून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. दोन्ही बॅगमधील स्फोटकांची तपासणी केली असता त्यात ३६ किलो वजनाचे ४४० पॅकेट आढळले. जप्त करण्यात आलेली स्फोटके लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.दुसºया घटनेत आरपीएफचे उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, विवेक कनोजिया, उमेश सिंह, बिक्रम यादव यांनी रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली असता गाडीची तपासणी केली. चमूला मागील जनरल कोचमध्ये एक बेवारस बॅग आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांनी या बॅगवर आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात ५,४०० रुपये किमतीच्या १९ बाटल्या आढळल्या. जप्त करण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.