शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

महापौर करंडक राज्यस्तरीय स्पर्धेत ४२ एकांकिका

By admin | Updated: July 3, 2016 02:49 IST

नागपूर महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने महापौर करंडक

आज सुरुवात : राज्यभरातील नामांकित संस्थांचा सहभाग नागपूर : नागपूर महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ३ ते १० जुलै २०१६ दरम्यान सायंटिफिक सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. यात ४२ एकांकिका सादर केल्या जाणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, स्थापत्य समितीचे सभापती सुनील अग्रवाल, आरोग्य सभापती देवेंद्र मेहर, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.रविवारी सकाळी ९.३० वाजता महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. विशेष अतिथी म्हणून नाट्य व चित्रपट अभिनेता तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर उपस्थित राहतील. यावेळी अमदार अनिल सोले, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, आमदार प्रकाश गजभिये, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे व कृष्णा खोपडे, उपमहापौर सतीश होले, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतील. या स्पर्धेची सुरुवात प्राथमिक फेरीने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २६ जून २०१६ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात झाली. महापौर एकांकिका स्पर्धा ही विविध एकांकिका स्पर्धातून १ जानेवारी २०१३ ते या स्पर्धेच्या प्रवेशिकेची अंतिम मुदत २५ जून २०१६ या कालावधीत पारितोषिक प्राप्त अव्वल ठरलेल्या एकांकिकांची स्पर्धा आहे. परंतु नागपूसह विदर्भात नवीन व दमदार कलाकृ तींना संधी मिळावी. यासाठी प्राथमिक स्पर्धेतून १२ एकांकिकांची निवड करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून अव्वल ठरलेल्या प्रारितोषिकप्राप्त प्रवेश घेतलेल्या एकांकिका ३० संस्थांच्या आहेत. अशा एकूण ४२ एकांकिका सादर करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी यांनी दिली. प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत १० जुलैला रात्री ८ वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा व समारोप केला जाणार आहे. या स्पर्धेचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन क्र ीडा व सांस्कृतिक सभापती हरीश दिकोंडवार, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, सभापती सुमित्रा जाधव, प्रमोद भुसारी, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)