शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

४००० कोरोनाबाधितांचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाचा १० महिन्याच्या काळात ४००० कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. यात शहरातील २६६७, ग्रामीण भागातील ७०७ तर जिल्हाबाहेरील ६२६ ...

नागपूर : कोरोनाचा १० महिन्याच्या काळात ४००० कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. यात शहरातील २६६७, ग्रामीण भागातील ७०७ तर जिल्हाबाहेरील ६२६ आहेत. सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. या महिन्यात १४०६ रुग्णांचे बळी गेले. शुक्रवारी पुन्हा ७ रुग्णांचा जीव गेला तर ४५६ नव्या रुग्णांची भर पडली. बाधितांची एकूण संख्या १२७११०वर पोहचली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत ३.१४ टक्के मृत्यू झाले आहेत.

नागपूर जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. नंतर हळूहळू रुग्णांची संख्या वाढताच मृत्यूची संख्या वाढायला लागली. एप्रिल महिन्यात २, मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८, ऑगस्ट महिन्यात ९१९, सप्टेंबर महिन्यात १४०६, ऑक्टोबर महिन्यात ९५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्यापासून मृत्यूची संख्या कमी होऊ लागली. या महिन्यात २६९ तर डिसेंबर महिन्यात २५८ रुग्णांचे बळी गेले. मृतांमध्ये ५० वर्षांवरील वयोगटातील रुग्णांची संख्या मोठी आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूला श्वसनाचा आजार, अनियंत्रित मधुमेह, उच्चरक्तदाब, मूत्रपिंड व यकृताचा आजारही कारणीभूत ठरला आहे.

-३५८ रुग्ण झाले बरे

आज ४९३८ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ४१७६ आरटीपीसीआर तर ७६२ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३५६, ग्रामीण भागातील ९६ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्ण होते. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीण भागातील १ तर जिल्हाबाहेरील ४ होते. ३५८ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ११८६३९ झाली आहे. ४४७१ कोरोनाचे रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

-महिन्यातील मृत्यू

महिना मृत्यू

एप्रिल २

मे ११

जून १५

जुलै ९८

ऑगस्ट ९१९

सप्टेंबर १४०६

ऑक्टोबर ९५२

नोव्हेंबर २६९

डिसेंबर २५८