शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार हॉकर्स करणार भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 03:09 IST

पर्यायी व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत हॉकर्सना इतरत्र हटविण्यात येऊ नये, त्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्यावा, ...

प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटले : नव्याने नोंदणी करण्याचे आश्नासन नागपूर : पर्यायी व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत हॉकर्सना इतरत्र हटविण्यात येऊ नये, त्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्यावा, या मागणीसाठी शहरातील ४० हजार हॉकर्स रविवारी शहरात भीक मांगो आंदोलन करतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी दिला. आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात शहरातील हॉकर्सच्या शिष्टमंडळाने शनिवारी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. दोन तास घेराव घातला. यावेळी झालेल्या चर्चेत शहरात नागपूर महापालिकेकडे १० झोनमध्ये ३४,३१७ हॉकर्स आहेत. यात धंतोली ४०७२, लक्ष्मीनगर २५३९, सतरंजीपुरा ३३८५, नेहरूनगर ३१९०, आशीनगर ३३५५, हनुमाननगर ४७१६, लकडगंज ३५७५, मंगळवारी ३३६९, धरमपेठ २९८८ आणि गांधीबाग झोनमध्ये ३१३० अशी हॉकर्सची नोंदणी आहे. परंतु महानगरपालिकेमध्ये अजूनपर्यंत हॉकर्स धोरण तयार झालेले नाही. त्याची चर्चा मनपा सभागृहामध्येसुद्धा नाही. व्हेंडिंग कमिटीची बैठकसुद्धा झाली नाही. व्हेंडिंग कमिटीच्या सदस्यांना जागा दाखविली नाही. ४० हजार हॉकर्सपैकी १८०० हॉकर्सची नोंदणी करण्यात आली. सर्वांकडून ६२ लाख रुपये जमा करण्यात आले. परंतु त्यांच्यासाठी पाणी, वीज, शौचालय आदींची व्यवस्था करण्यात आली नाही. प्रत्येक रविवारी हॉकर्स बर्डी तसेच इतर ठिकाणी व्यवसाय करतात. जी व्यवस्था दाखविली तिथे पाणी नाही. शौचालय नाही. वीज नाही. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न हॉकर्सच्या शिष्टमंडळाने उपस्थित केला. यावेळी नव्याने नोंदणी करण्याचे आश्नासन देण्यात आले. यानंतर हॉकर्सच्या शिष्टमंडळाने यावेळी सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांचीही भेट घेतली. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात गोपी अंभोरे, अविनाश तिरपुडे, प्रमोद मिश्रा, संदीप शाहू, विजू ढगे, प्रशांत खोडे, विनोद खोडे, श्याम मेश्राम, रेखा डोये, चंदू अग्रवाल, नरेश ढगे, रज्जाक कुरेशी, अनिल अंभारे, जावेद अन्सारी, इफ्तेखार लीडर, जाकीर अहमद, राजेश जवंजाळकर, संदीप मेंढे, जहरूभाई आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)