शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

४.७३ लाखाचे ३८ मोबाईल पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:07 IST

प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाºया टोळीचा रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केला आहे. रविवारी आरपीएफने केलेल्या कारवाईत चोरीचे ४.७३ लाखाचे ३८ मोबाईलसह एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली ....

ठळक मुद्देरेल्वेस्थानकावर आरपीएफची कारवाई : एकाला अटक, दोघे फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाºया टोळीचा रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केला आहे. रविवारी आरपीएफने केलेल्या कारवाईत चोरीचे ४.७३ लाखाचे ३८ मोबाईलसह एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली असून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गठित केलेल्या चमूतील उपनिरीक्षक होती लाल मिना, आरपीएफचा जवान विकास शर्मा, बिक्रम यादव, विवेक कनोजिया, उमेश सिंह हे रविवारी १२ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. यावेळी त्यांना इटारसी एण्डकडील भागात एक संशयित व्यक्ती फिरताना आढळला. चौकशीत त्याने आपले नाव सिनम कार्तिक श्रीनिवास (१९) रा. कोत्तरपूर, करीमनगर, तेलंगणा सांगितले. तो बी. ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून करीमनगरमध्ये नर्सिंगचे काम करतो. रेल्वेस्थानकावर येण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात सॅमसंग, ओप्पो, एमआय, पॅनासॉनिक, व्हिओ कंपनीचे ३८ मोबाईल आढळले. बाजारभावानुसार या मोबाईलची किंमत ४ लाख ७३ हजार २०० रुपये आहे. याशिवाय त्याच्याजवळून एक गुल्लर, हाताची घड्याळ, दोन पाकिट, एक चाकू असे साहित्य जप्त करण्यात आले. विविध ठिकाणावरून हे मोबाईल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. आरपीएफचे जगदीश सोनी, विवेक कनोजिया, संजय खंडारे यांनी १५ बंद मोबाईल सुरू करून मोबाईलच्या मूळ मालकाशी संपर्क साधला. आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सर्पुद करण्यात आले.लोहमार्ग पोलीस करतात तरी काय ?रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे मोबाईल, पाकीट चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेल्वेस्थानकावर असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला असून रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोहमार्ग पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. नव्यानेच नागपूर ठाण्याचा पदभार स्वीकारलेले निरीक्षक वासुदेव डाबरे हे गुन्हेगारांवर अंकुश लावण्यात यशस्वी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु पदभार स्वीकारून दोन महिने उलटूनही स्थिती जैसे थे असल्यामुळे ते गुन्हेगारांचा बंदोबस्त लावण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहेत. लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी रेल्वेस्थानकावरील असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त लावण्याची मागणी होत आहे.